जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळा उत्साहात संपन्न – संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत २१ पंपाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते.
जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळा उत्साहात संपन्न
- उमरखेड
हजारो भाविक भक्तांनी घेतले दर्शन
कॉटन मार्केट पासून निघालेली नरेंद्राचार्य महाराजांच्या पादुकांच्या रॅलीने सर्व शहर शहरातील भावी भक्तांचे लक्ष वेधले
कॉटन मार्केट पासून निघालेली रॅली दीड किलोमीटर पर्यंत तिवडी रोडवरील शिवकमल मंगल कार्यालयात पोहोचली, त्यावेळी शिवकमल मंगल कार्यालयाला आले जत्रेचे स्वरूप
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा भव्य पादुका दर्शन सोहळा उमरखेड पासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शहराबाहेरील शिवकमल मंगल कार्यालय या ठिकाणी अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणावरून जगद्गुरु स्वामींचे पादुका असलेली रॅली वाजत-गाजत शहरातील मुख्य रस्त्याने ढानकी रस्त्याने तिवडी रोड येथील शिवकमल मंगल कार्यालय आगमन होतात नवदांपत्यांच्या हस्ते जगद्गुरु श्रींच्या पादुका यांचे औक्षण केले त्यानंतर संत पिठावर माऊलींचे आगमन होताच सुमारे दोन तास षोडशोपचारे, मंत्राद्वारे, असंख्य महिलांच्या उपस्थीतीत पुजा व महाआरती करण्यात आली त्यानंतर संस्थांनच्या सामाजिक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना फवारणीच्या 2१ पंपांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यात यावेळी शहरातील गोपाल अग्रवाल, महेश काळेश्वरकर . गजेंद्र ठाकरे,अजय बेदरकर ,प्राध्यापक शिवाजी राठोड अतुल खंदारे, सवीता चंद्रे, अंबादास धुळे, रवी शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते गरजू व गरीब शेतकरी बंधूंना फवारणी पंपांचे वाटप करण्यात आले त्यानंतर जगद्गुरु श्रींच्या पादुकांचे षोडशोपचारे पूजा करण्यात आली त्यानंतर जनम प्रवचनकार उजळंबे यांचे प्रवचन झाले त्यानंतर हजारो भाविक भक्तांनी जगद्गुरु श्रींच्या पादुका चे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तगणांनी घेतला त्यानंतर दीक्षा घेण्यास आलेल्या भक्तांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी ऑनलाइन उपासक दीक्षा दिली या भक्तीपूर्ण सोहळ्याचा आनंद जवळपास सात हजार भक्तांनी घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पश्चिम विदर्भ उपपीठ समिती, स्व स्वरूप संप्रदाय यवतमाळ (पश्चीम ), जिल्हा सेवा समिती, तालुका सेवा केंद्र सेवा समिती ,युवा सेना, महिला सेना, हिंदू संग्राम सेना आदींनी विशेष परिश्रम घेऊन सदर पादुका दर्शन सोहळा यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाने मात्र शहरातील भाविक भक्तांनी पादुका दर्शनाचा लाभ घेऊन शहरात निघालेल्या भव्य दिव्य रॅलीचा भाविक भक्तांनी सामील होऊन आनंद व्यक्त केला शहरातील वातावरण एकदम भक्तीमय होऊन गेले होते तर मंगल कार्यालयाच्या बाहेर विविध स्टॉलची ऊभारणी करण्यात आली होती
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.