काळानुरूप उद्योगात बदल करणे आवश्यक डॉ सचिन लड्डा

youtube

काळानुरूप उद्योगात बदल करणे आवश्यक… डॉ सचिन लढ्ढा

उमरखेड..
पार्वतीबाई काशिनाथस्वामी शिरडकर ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मरसुळ व शितल सखी मंच व्दारा मोफत उद्योजकता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन महात्मा बसवेश्वर अभ्यासिका उमरखेड येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाॅ सचिन शामसुंदर लढ्ढा, डायरेक्टर, इनोव्हेशन ईन्युबेशन अँड लिंकेज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, माजी प्राचार्य पी वी पॉलिटेक्निक, एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई, डायरेक्टर .शितल लढ्ढा रिसर्च सोसायटी यांचे मार्गदर्शन व परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात होता.जवळपास १८ वर्षाचा स्कील डेव्हलपमेंट चा प्रदिर्घ अनुभव असलेल्या डॉ लढ्ढा यांनी काळानुरूप आपल्या व्यवसायात बदल करून नवनविन टेक्नॉलॉजी चा वापर करून आपल्या उद्योगाची ओळख सर्व लाभार्थ्यापर्यत पोहचवणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. पार्वती ग्रुप व शितल सखी मंच यांच्या माध्यमातून शेकडो बिझनेस आयडियाज बाबात योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण ग्रामीण भागातील महिलांना उपलब्ध होणार आहे. सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक क्षेत्रात महिलांना नविन संधी उपलब्ध असून ग्रामीण भागातील मिहला यापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील छोट्या उद्योगांना प्रदर्शनीच्या माध्यमातून नविन दिशा देण्याचे कार्य व ऑनलाईन महिला व्याख्यानमाला शितल सखी मंच च्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात उमरखेड क्षेत्रात कार्यरत उद्योजक, हजारो शेतक-यांना दुग्धव्यवसाय च्या माध्यमातून स्वयंरोजगार मिळवून देणारे नमस्कार एग्रो इंडस्ट्रीज चे संचालक संदिप भट्टड, संजिवनी आटा चे संचालक जगदेराव तावडे, कृषी भुषण पुरस्कार प्राप्त भद्रा एग्रो इंडस्ट्रीज चे संचालक आश्विन कळलावे, मागिल दहा वर्षापासून गृह उद्योग सुरू करून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करणा-या . शारदाताई  धात्रक, श्रीजी इंडस्ट्रीज चे संचालक शैलेश दिघेवार यांचा सन्मान डॉ लढ्ढा यांच्या हस्ते करण्यात आला. नवयुवकांनी अभ्यासासोबतच एक प्लान बी तयार ठेवणे गरजेचे असून केवळ नोकरी च्या मागे न लागता कृषी व औद्योगिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करावी असे मत संस्थेचे संस्थापक व्ही के शिरडकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पार्वती चॅरिटेबल हाँस्पीटल चे संचालक डॉ विष्णूकांत शिवणकर,पार्वती ग्रुपच्या अध्यक्षा रूपाली शिरडकर,सदस्य राहुल भोकरे,बालाजी कदम, गुरुदास स्वामी,प्रा. अशोक भोसीकर, विजय हिंगमिरे, माधुरी दळवी, पुजा अमृते व बचत गटाच्या महिला, विद्यार्थी व उमरखेड शहरातील व्यवसायीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी शिरडकर यांनी केले तर विशाल स्वामी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋषीकेश, योगेश शिरडकर, लोखंडे, रमेश वाघमारे, दिलीप पवार,ओंकार शिरडकर, ओंकार कदम, गजानन गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “काळानुरूप उद्योगात बदल करणे आवश्यक डॉ सचिन लड्डा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!