आईने सख्ख्या पोटच्या दोन चिमुकले लेकरांची केली हत्या व शव जाळले धक्कादायक प्रकार उघाडीस

youtube

आईने सख्ख्या दोन चिमुकल्या लेकरांची केली हत्या व शव जाळले धक्कादायक घटना उघडकीस

भोकर तालुक्यातील पांडुरणा येथील खळबळजनक घटना ; अवघ्या ४ महिन्याच्या निष्पाप मुलीचा व २ वर्षाच्या मुलाचा यात समावेश

भोकर :

तालुक्यातील मौ.पांडुरणा येथील एका निर्दयी मातेने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्या लेकरांची हत्त्या करुन शव जाळले व आई आणि भावाच्या मदतीने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.क्रुरतेचा कळस गाठणा-या या खळबळजनक घटने प्रकरणी तिघांविरुद्ध दि.२ जून रोजी भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की,पांडुरणा ता.भोकर येथील शेतकरी गोविंद दगडुजी निमलवाड(८५) यांनी भोकर पोलीसात फिर्याद दिली की दि.३१ मे २०२२ चे रात्री ८:०० आणि दि.१ जून २०२२ चे सायंकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान त्यांची सून धुरपताबाई गणपत निमलवाड (३०) हिने तिचा मुलगा दत्ता गणपत निमलवाड(२ वर्ष) व मुलगी अनुसया गणपत निमलवाड (४ महिने) या दोघांना मारुन टाकले आणि तिची आई कोंडाबाई पांडुरंग राजेमोड,भाऊ माधव पांडुरंग राजेमोड,दोघे ही रा.ब्राम्हण वाडा ता.मुदखेड यांच्या मदतीने मयत लेकरांचे शव पांडुरणा शिवारात जाळून टाकले.तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

क्रुरतेचा कळस गाठणा-या या घटनेची माहिती प्राप्त होताच भोकर पोलीस ठाण्याचे पो.नि.विकास पाटील,पो.उप.नि.अनिल कांबळे,पो.उप.नि.दिगांबर पाटील,महिला पो.उप.नि.राणी भोंडवे व आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीच पांडुरणा व घटनास्थळी भेट दिली.तसेच उपरोक्त आशयाच्या फिर्यादीनुसार दि.२ जून २०२२ रोजी पहाटे २:१० वाजता याप्रकरणी धुरपताबाई गणपत निमलवाड (३०) रा.पांडुरणा,कोंडाबाई पांडुरंग राजेमोड,माधव पांडुरंग राजेमोड,दोघे ही रा.ब्राम्हण वाडा ता.मुदखेड या तिघांविरुद्ध गुरन.१९५/२०२२ कलम ३०२,२०१,३४ भादवि प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून फॉरेन्सिक टिम ही कर्तव्य बजावत आहे.तर या गुन्ह्यात सदरील निर्दयी मातेने चिमुकल्या मुलाच्या तोंडात माती भरवून मारुन टाकले व त्याचे प्रेत ब्राह्मण वाडा ता.मुदखेड शिवारातील एका उसाच्या शेतात फेकून दिले.तर निष्पाप मुलीस मारुन पांडुरणा शिवारातील एका नाल्याजवळील खड्यात पुरुन टाकले.ही माहिती आरोपी महिलेच्या वरील उल्लेखीत आई व भावास समजताच त्यांनी मयत मुलाचे व पुरलेल्या मुलाचे शव एकत्र जमविले आणि पांडुरणा शिवारातील आरोपी महिलेच्या शेतात आणून जाळून अत्यसंस्कार केले.नव्हे तर ते शव जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.यानंतर ती निर्दयी आई घरी आली व शांतपणे बसून राहिली.काही वेळाने तिचा पती व सासरा हे घरी आले.यावेळी त्यांनी लेकरं कुठे आहेत ? म्हणून तिची विचारपुस केली असता ही ह्रदय हेलावून टाकणारी माहिती समोर आली आहे.असे सांगण्यात येत असले तरी आपल्या पोटच्या निष्पाप मुलांना मारुन हे क्रुरतेचा कळस गाठणारा गुन्हा करण्या मागील नेमके काय कारण आहे,हे मात्र अद्याप समजू शकले नाही.भोकर पोलीसांनी त्या निर्दयी मातेस व तिला मदत करणाऱ्या अन्य दोघांना ताब्यात घेतले असून पो.नि.विकास यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पो.उप.नि.दिगांबर पाटील हे करत आहेत.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!