वैजनाथ स्वामी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
माहू ता.(प्रतिनिधी) नितीन तोडसाम
माहूर नगर पंचायतचे कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांचा वाढ दिवस स्थानीक कपिलेश्वर मंदिराच्या सभागृहात नगर पंचायतीचे अधिकारी,कर्मचारी, विविध पक्षाचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते,व पत्रकारांच्या उपस्थितीत दि.२०जून रोजी उत्साहात व थाटात संपन्न झाला.
मृद भाषी व संवेदनशील व्यक्ती म्हणून सुपरिचित असलेल्या वैजनाथ स्वामी यांनी माहूर नगर पंचायतच्या कार्यालयीन कामात सुसूत्रता आणून विकास कामात महत्वपूर्ण भूमिका साकारली असून सर्वसामान्य नागरिकांच्या कामाला अधिक प्राधान्य दिल्याने शहरात ठीकठिकाणी त्यांचा वाढ दिवस साजरा करण्यात आला.त्यामुळे त्यांच्या जनसंपर्काची सहजच कल्पना येते, अशी भावना व्यक्त होत आहे.
माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्राचार्य राजेंद्र केशवे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, शिवसेना शहरप्रमुख निरधारी जाधव, नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष सागर ऊर्फ गोपु भाऊ महामुने, काँग्रेस पक्ष गटनेते प्रा.बालाजी भंडारे, रफीक सौदागर, इलियास बावाणी,ज्येष्ठ पत्रकार विजय आमले, जय कुमार अडकीने, नगर अभियंता प्रतिक नाईक, सुनिल वाघ, देविदास सिडाम आदींनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचे अभिष्टचिंतन केले.
मनोगतपर भाषणातून वैजनाथ स्वामी यांनी नगर पंचायत माहूरला रुजू झाल्या नंतर पाच नगराध्यक्षा सोबत काम केल्याचा अनुभव कथन करून नगरसेवकांसह सर्वांनी सहकार्य केल्या बद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करून भविष्यात असेच सहकार्य व स्नेह कायम रहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमास सभापती विजय कामठकर, निस्सार कुरेशी,अफसर भाई,ईरफान भाई यांचेसह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थीत होते.