बेघर मनोरुग्णांसाठी डॉक्टर प्रशांत कसारे यांनी महीला मनोरुग्णांच्या बोटातून काढल्या सहा अंगठ्या आँपरेशन करून आणी दिले बेघर मनोरुग्णास जिवनदान

youtube

बेघर मनोरुग्णांसाठी डॉक्टर प्रशांत कसारे यांनी महीला मनोरुग्णांच्या बोटातून काढल्या सहा अंगठ्या आँपरेशन करून आणी दिले बेघर मनोरुग्णास जिवनदान

कित्येक वर्षापासून पाटीपुरा परिसरात बेवारस अवस्थेत फिरत असलेली रसिका तुळशीदास भगत मनोरुग्ण रस्त्याने चालता चालता गाने म्हणायची तर चालता चालता डान्स करायची गाणे म्हणून व डान्स करून दुकानदार तिला खायला प्यायला द्ययाचे अशा अवस्थेत ती आपला पोटाची खळगी भरीत होती
रसिका तुळशीदास भगत हिचे मुळ हरियाणा सांगत असून तिला हरीयाणा राज्यातून कुणीतरी वर्ष-दोन वर्षे आधी यवतमाळ बस मध्ये बसून दिले होते आणि तिने पाटीपुरा परिसर काठले रस्त्यावर झोपून दिवस काढायची एका हाताला तिच्या चार बोटे बहुतेक करून याच परीस्थिती मूळे झाले असेल आणि दुसर्‍या हातात पाच बोटे पण एका बोटात सहा अंगठ्या म्हणजेच एक अंगठी व पाच वायसर फसलेले होते भयंकर वास येत होता त्या वायसर मूळे मोठी सूजन आली होती रसीकाला भयंकर त्रास होत होता अशा परिस्थितीत ती रस्त्यावर फिरायची आणि हॉटेलमध्ये मागून मागून जेवण करून राहायची नुकतेच चालू झाले नंददीप फाउंडेशन व सेवा समर्पण बेघर मनोरूग्ण निवारा केंद्र यवतमाळच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी ही जागा दिल्यामुळे चालू झालेले हे बेघर निवारा केंद्र आज दिनांक 23 /6/2022 रोजी 40 बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राच्या साऱ्यात राहत आहे याच बेघर निवारा केंद्रावर 6 दिवसांपूर्वी वाघापूर नाका वर असलेली रसिका तुळशीदास भगत आढळून आली एका ऐंबूलंस चालकाने फोन करुन कळविले होते की एका स्त्रीच्या बोटात फसलेली अंगठी आहे आणि ती मानसिक रुग्ण आहे वास खूप भयंकर येत आहे आपण तिला आपल्या केंद्रावर दाखल करू शकता का क्षणाचाही विलंब न करता नंददीप फाउंडेशन चे संदीप शिंदे, स्वप्निल बागवाले संजय वगारे त्या ठिकाणी पोहोचले व त्या महिलेला नागापूर नाक्यावरून बेघर निवारा केंद्र समर्थवाडी सुनीता बिल्डिंग समोर नगरपालिका शाळा क्रमांक 19 येथे दाखल केले मानसोपचार तज्ञ शासकीय रुग्णालयाचे एच्ओडी डॉ डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांनी मोफत उपचार व औषधोपचार केले सहा दिवसात ती बोलायला चालायला लागली आणि तिच्या बोटाच्या अंगठ्या काढायच्या होत्या वास खूप भयंकर येत होता अशा परिस्थितीमध्ये पाच वर्षापासून मनोरुग्ण सेवेला मदत करणारे डॉक्टर प्रशांत कसारे यांना या रुग्णाची आपबिती सांगितली डॉक्टर प्रशांत कसारे सरांनी कोणताही विचार न करता बेघर मनोरुग्न सेवेसाठी धावून आले मोफत सोनोग्राफी केली एक्स-रे काढले व क्षणाचाही विलंब न करता त्या महिला मनोरुग्णाला होत असलेला त्रास लक्षात घेऊन डॉक्टर प्रशांत सारे सरांनी त्या महिलेच्या बोटातून अंगुठी काढायला सुरुवात केली असता असे दिसून आले की बोटाच्या मधात फसलेली मासात असलेली अंगठी होती आणि मागे सहा लोखंडी हेवी वाले वायसर फसले होते तेव्हा डॉक्टर प्रशांत कसारे सरांनी अति परिश्रम करून ते वायसर व अंगठी अलगत काढले व या वेदनेपासून मनोरुग्ण रसिकाला डॉक्टर प्रशांत कसारे यांनी मोफत औषधोपचार देऊन सुटका केली लवकरच रसिकाचे बोट दुरुस्त होणार आहे बेघर रसिकाला अर्थो स्पेशलिस्ट सर्जन डॉक्टर प्रशांत कसारे यांनी बोटातून अंगठी व वायसर काढून जीवन दान दिले डॉक्टर प्रशांत कसारे सरांचा स्टॉप पाहून गहिवरला त्यांच्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले सर्वांनी डॉक्टर प्रशांत कसारे सरांना या सेवेत मदतीचा हात पुढे केला कसारे हॉस्पिटल हे या बेघर मनोरुग्णांसाठी देवदूतच ठरले नंददीप फाउंडेशन व सेवा समर्पण प्रतिष्ठान बेघर मनोरूग्ण निवारा केंद्र डॉक्टर प्रशांत कसारे सरांचे सदैव आभारी राहील आपणासारख्या डॉक्टरांनी जर मनोरुग्ण सेवेला साथ दिली तर ही सेवा महाराष्ट्र भर अमूल्य सेवा ठरेल बेघरांना आपल्यासारख्या डॉक्टरांची मदतीची आवश्यकता आहे डॉक्टर प्रशांत कसारे यांनी बेघर मनोरुग्णांसाठी सदैव मोफत सेवा देणार असे डॉक्टर प्रशांत कसारे सरांनी सांगितले बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रातर्फे व यवतमाळ वासियात तर्फे डॉक्टर प्रशांत कसारे सरांचे शतशः आभार व्यक्त केले गाडगे बाबा🙏🙏

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!