महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला आहे की, एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा माजी मुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे हे एकटेच मुख्यमंत्री पदाचा शपथविधी घेतील असेही फडणवीस यावेळी म्हणाले. त्यानंतर काही दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल. मी मंत्रिमंडळाबाहेर राहील, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. आज सकाळीच शिंदे गट मुंबईत दाखल झाला. त्यानंतर सागर बंगल्यावर फडणवीस आणि शिंदे यांची भेट झाली. तेथे चर्चा झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली.



