ढाणकी येथे महाराजस्व अभियाना अंतर्गत शैक्षणिक प्रमाणपत्र चे वाटप .

youtube

ढाणकी येथे महाराजस्व अभियाना अंतर्गत शैक्षणिक प्रमाणपत्र चे वाटप .

ढाणकी प्रतिनिधी- वसंता नरवाडे

ढाणकी त महाराजस्व अभियानाअंतर्गत महसूल प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्थानिक कस्तुरबा गांधी विद्यालयात जात प्रमाणपत्रे, आदिवास, उत्पन्न प्रमाणपतत्राचे प्रकरणे स्वीकारून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर व्यंकट राठोड यांच्या च्या सूचनेनुसार सदर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सदर कॅम्प ला तहसीलदार आनंद देऊळगावकर यांचे मार्गदर्शन लाभले होते.
नुकत्याच शाळा उघडल्या असून विद्यार्थ्यांची विविध शाखेत प्रवेश घेण्यासाठी घाई सुरू आहे. अशा वेळी शैक्षणिक कागदपत्रे काढण्यासाठी विद्यार्थी तसेच पालकांना कोणताही त्रास होऊ नये व सर्व एकाच छताखाली सुलभपणे व माफक दरात प्रमाणपत्रे मिळावी या हेतूने सदर कॅम्प राबवण्यात आला होता. यावेळी मंडळ अधिकारी सचिन फटाले, तलाठी गावंडे, गारोळे , प्रकाश हापसे, भोजने, कानडे, डोंगरे, इंगळे, शिवणकर, मारकवार, कोतवाल, भांडवले, सूर्यवंशी, शेख इब्बू, इत्यादी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, श्रीमती एस पी शिंदे, व सहशिक्षक, ए ए अलोणे यांनी विशेष परिश्रम घेतले .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!