विवाहितेस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी सासर्‍याला अटक.

youtube

विवाहितेस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी सासर्‍याला अटक.

पिंपळगाव वन येथील घटना.

ढाणकी
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळगाव वन येथील विवाहितेने दिनांक 28 जून रोजी विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
सविस्तर वृत्त असे की, मौजे टेम्भूरदरा येथील माहेर असलेल्या बाली केशव राठोड (24 वर्ष )हीचा विवाह पिंपळगाव येथील इंदल जाधव यांच्याशी सन 2018मध्ये झाला होता. इंधन व बाली चा संसार व्यवस्थित चालू असताना बाली ही तीन महिन्याची गरोदर होती. मात्र सासूच्या निधनानंतर सासरा देवबा गणपत जाधव हा आपली सुन बाली हिस सतत शारीरिक व मानसिक त्रास देत होता. यामुळे त्रस्त झालेल्या बाली हिने पिंपळगाव येथील विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली.
याप्रकरणी बाली इंदल जाधव हिची आई शिलाबाई किशोर राठोड हिने दिलेल्या फिर्यादीवरून सासरा देवबा गणपत जाधव याच्याविरुद्ध भादवि 306 नुसार गुन्हा नोंद केला असून त्यास अटक केली आहे. पुढील तपास बिटरगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के, मोहन चाटे, गजानन खरात, विद्या राठोड, अतिश जारंडे, निलेश भालेराव, दत्ता कुसराम हे करत आहेत.

Google Ad
Google Ad

1 thought on “विवाहितेस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी सासर्‍याला अटक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!