डॉ विजय माने ‘सन ऑफ सॉईल’ पुरस्काराने सन्मानित
डॉ विजय माने ‘सन ऑफ सॉईल’ पुरस्काराने सन्मानित
‘सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ तर्फे दिला जातो राज्यस्तरीय पुरस्कार
अमरावती येथे मान्यवरांच्या हस्ते डॉ माने सन्मानित
उमरखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा
उमरखेड/प्रतिनिधी :
आपल्या कार्यकर्तृत्वाने उत्तुंग भरारी घेतलेल्या भूमिपुत्रांचा व निवडक मातृशक्तीचा पुरस्कार वितरण सोहळा काल अमरावती येथे हॉटेल गौरी इन इथे पार पडला. यावेळी उमरखेड चे मातीशी इमान ठेवणारे भूमिपुत्र डॉ. विजय माने यांना ‘सन ऑफ सॉईल’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ.विजय माने यांनी आपल्या तालुक्याशी नाळ कधीही तोडली नसून अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आणि उमरखेड येथील कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. विजय माने हे आपल्या तालुक्याचे नाव मोठे व्हावे, शेतकऱ्यांचे आयुष्याचे सोने व्हावे, त्यांच्या घरात आर्थिक समृद्धी नांदावी यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. सामाजिक जानीवेचा वारसा डॉ. विजय माने यांना कुटुंबातच मिळाला आहे. सत्यशोधक भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतीनिष्ठ चळवळ महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोहोचविले आहे. याचे श्रेय भूमिपुत्र डॉ. विजय माने यांनाच जाते. शासकीय नोकरीत उच्चपदस्थ अधिकारी असताना सुद्धा त्यांनी आपली नाळ मातीशी जुळून ठेवली आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्राच्या प्रतिष्ठाचा असा ‘सन ऑफ सॉईल’ हा पुरस्कार देऊन त्यांना काल दिनांक 2 जुलै रोजी येथे मान्यवऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आला.
यावेळी पुरस्कार सोहळ्यास राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अनिल बोंडे , पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे, पद्मश्री डॉ स्मिता कोल्हे, डॉ.अविनाश सावजी व सकाळ समुहाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!