वाई बाजार येथील सततच्या पावसामुळे घरांची पडझड तर अनेकांच्या घरात पाणी.

वाई बाजार येथील सततच्या पावसामुळे घरांची पडझड तर अनेकांच्या घरात पाणी.
प्रशासनाकडून आर्थिक मदतीची मागणी .
श्रीक्षेञ माहूर – नितीन तोडसाम
माहूर तालुक्यात गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतात पाणी गेल्याने शेताला शेत तळ्याचे स्वरुप आले असून पेरलेली पिके वाया गेली आहे.तर काही नागरिकांच्या घरांची पडझड झाली असून भर पावसातच निवारा गेल्याने नुकसानग्रस्त शेतकर्यांनी व नागरिकांनी प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
गेल्या आठवड्यापासून तालुक्यात पावसाची दमदार हजेरी असून होत असलेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतकर्याच्या शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहे तर शेताला शेत तळ्याचे स्वरुप आले आहे.यातच काही गरीब कुटूबांच्या मातीच्या व तट्याच्या घरांची पडझड झाली आहे तर काही घरामध्ये पाणी गेल्याने पावसाळ्यातच आपला निवारा गमवावा लागल्याने नूकसानग्रस्ताकडून आर्थिक मदतीची याचना प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
तालुक्यातील वाई बाजार येथील प्रभाग क्र.१ मधील अंत्यत गरीब व अठराविश्व दारिद्र असलेल्या परीट (धोबी ) समाजातील मनोज उत्तम निक्कम यांचे तट्याचे राहते घर सततच्या पावसाने पडले असून घरावरील टिनपञे वार्यानी उडाली आहे.लोकांची भांडी घासून व कपड्याची प्रेस करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मनोज निक्कमला भर पावसात आपला निवारा गमावल्याने रत्यावर राञ काढावी लागत असून आर्थिक विवंचनेत सापडला आहे.त्याच बरोबर किशोर निक्कम यांच्या घरावर अनेक वर्षापासून जुने असलेल्या पिंपळाच्या वृक्षाची मोठी फांदी पडल्याने घरावरील टीन पञे फाटून गेली तर पडलेल्या फांदीने घरात असलेल्या चार ते पाच कोंबड्याचा या घटनेत मृत्यू झाल्या असून सुदैवाने घरातील नांगरिकांना कुठे हि दुखःपत झाली नाही.या पडलेल्या फांदीने घरातील रोजच्या उपयोगातील भांड्याचे हि मोठ्या प्रमाणात नूकसान झाल्याने त्यांनीही संबधीत प्रशासनाने तातडीने पंचनामे करुण आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
चौकट..
गेली अनेक वर्षापासून असलेल्या पिंपळाच्या वृक्षापासून आमच्या जिवाला धोका निर्माण झाला असून संबधीत प्रशासनाने सदरील पिंपळाच्या वृक्षाच्या कुजलेल्या व घरावरील फांद्या तोडून भविष्यात होणारा अपघात टाळावा.
किशोर निक्कम
ग्रामस्थ वाई बाजार.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.