वाई बाजार येथील पिकांच्या नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी.

youtube

वाई बाजार येथील पिकांच्या नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी.

श्रीक्षेञ माहूर – नितीन तोडसाम

तालुक्यातील वाई बाजार येथून गेलेल्या धनोडा ते किनवट राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१ अ,सी लगत असलेल्या शेतात रस्त्यावरील पावसाचे पाणी गेल्याने शेतात पेरलेले सोयाबीन व कपाशी पिक पूर्णतः सडून-करपून उन्मळली असल्याच्या बातम्या वृत्त पञातून दि.१२ जुलै रोजी प्रकाशित झाल्या होत्या, त्याची दखल घेत माहूर तहसीलदार किशोर यादव यांनी वाई बाजार येथे येवून शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पाहणी केली व नूकसान भरपाई देण्याचे आश्वासन संबंधीत शेतकर्‍यांना दिले आहे.

माहूर तालुक्यातील वाई बाजार येथून गेलेल्या धनोडा ते किनवट राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१ अ,सी लगत नाल्या केल्या नसल्यामुळे या रस्त्या लगत शेत असलेले अल्पभूधारक शेतकरी गंगाराम प्रमोद मडावी रा.कोलामखेड सर्वे क्र.१६५ व किसन मारोती गेडाम रा.वाई बाजार सर्वे क्र.१८३ यांच्या शेतात रस्त्यावरील पावसाचे पाणी गेल्याने शेतात पेरलेले सोयाबीन व कपाशी पिक पूर्णतः सडून-करपून उन्मळली असल्याच्या वृत्तपाञाच्या बातम्या दि.१२ जुलै रोजी प्रकाशित झाल्या होत्या त्याची दखल घेत माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी आपल्या कर्मचार्‍यासह महामार्गावर असलेल्या वाई बाजार येथील गंगाराम मडावी व किसन गेडाम यांच्या शेतातील बांधावरण जावून पाहणी करुण शेतकर्‍यांसी चर्चा करत झालेल्या नूकसानीचा मोबदला शासनाकडून मिळवून देऊ असे हि सांगितले परंतु धावपळ करुण केलेल्या दौर्‍यात वाई बाजार येथील अनेक गरीब कुंटूबांच्या पञाच्या घरात पाणी सिरल्याने व घरांची पडझड झालेल्या कुंटूबांना साधी भेटी न देता उंटावरुण शेळ्या राखण्याचा प्रकार अखेर समोर आला आहे.त्यामुळे माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांच्या प्रति वाई बाजार येथील नागरिकांमध्ये कमालीची नाराजी केली जात असल्याचे चिञ पहावयास मिळत आहे.कर्तव्यदक्ष आमदार भिमराव केराम यांनी आपतकालीन काळात अडचणी आल्यास संपर्क म्हणून आपल्या स्वीयसहाय्यकासह ता.पदाधिकारी, पोलीस प्रशासन,महसूल प्रशासन यातील प्रमुख अधिकार्‍यांचा भम्रनध्वनी क्रंमाक प्रसार माध्यमातून किनवट-माहूर मतदार संघातील जनतेपर्यंत पोहचविला आहे परंतु माहूर महसूल प्रशासनातील प्रमुख अधिकारी हे झोपेत असल्याने त्यांच्यापर्यंत जनतेचा आवाजात जात नसल्याने हे अधीकारी अतिवृष्ठीच्या संकट काळात मदतीला येतील का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून माहूर महसूल प्रशासनाच्या अधिकार्‍याच्या कार्यप्रनालीवर प्रश्न चिंन्ह निर्माण झाला आहे.

Google Ad
Google Ad

1 thought on “वाई बाजार येथील पिकांच्या नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी.

  1. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!