किनवट-माहुर तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी – आमदार भीमराव केराम यांचे मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री यांना निवेदन.

youtube

किनवट-माहुर तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी – आमदार भीमराव केराम यांचे मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री यांना निवेदन

किनवट-माहुर प्रतिनिधी:

काल दि. १३ जुलै रोजी किनवट-माहुर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी किनवट-माहुर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली व प्रशासनाला दुष्काळग्रस्त भागांचे पंचनामे करून तात्काळ शासनास पाठविण्याचे निर्देश दिले होते.
किनवट शहराजवळील पैनगंगा नदिचे पाणी शहरात घुसल्याने सखल भागातील रहिवाशांना त्याचा जबरदस्त फटका बसला आहे त्यामुळे तहसिल व नगर परिषद प्रशासनाला आदेशीत करून जवळपास २०० कुटुंबियांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तत्पूर्वी किनवट-माहुर तालुक्यातील तहसिलदार, महसूल विभाग, आरोग्य यंञणा व पोलिस यंञणेला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश आमदार केराम यांनी दिलेले आहे. दि. १३ रोजी किनवट-माहुर पुरपरीस्थितीचा आढावा घेऊन व परीस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आमदार केराम यांनी तात्काळ मुंबई गाठली व आज सकाळी मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन किनवट-माहुर तालुक्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तात्काळ आर्थिक मदत फक्त जाहिर न करता जलद गतीने त्यांच्या खात्यात वर्ग करावी जेणेकरून पावसामुळे कंबरडे मोडलेल्या बळीराजाला व नागरीकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

आमदार केराम यांनी किनवट-माहुर तालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे की पुरपरस्थिती हि संपूर्ण महाराष्ट्रावर ओढवली आहे तरी कुणीही खचून न जाता प्रशासनाला मदत कार्यात सहकार्य करावे व मी पालक तसेच लोकप्रतिनिधी या नात्याने संपूर्ण मतदारसंघातील परीस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस सतर्क राहून काळजी घ्यावी. मी शासन दरबारी किनवट माहुर तालुक्यातील जनतेसाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत कशी मिळेल याकडे लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही प्रकारच्या पुराची वा अपघाताची सुचना तात्काळ प्रशासनाला व माझ्या संपर्क कार्यालयाला कळवावे जेणेकरून तातडीने मदत करण्यात येईल असे त्यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ सांगितले आहे.

Google Ad
Google Ad

1 thought on “किनवट-माहुर तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी – आमदार भीमराव केराम यांचे मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री यांना निवेदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!