पैनगंगा नदीच्या तुंबामुळे संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

youtube

पैनगंगा नदीच्या तुंबामुळे संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

ढाणकी प्रतिनिधी – वसंता नरवाडे,,

उमरखेड तालुक्यात मागील सहा दिवसापासून संत त धार पाऊस कोसळत असल्यामुळे उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर, ढाणकी, करंजी, बिटरगाव, भोज नगर तांडा, रतन नाईक तांडा, पिंपळगाव, गणेश वाडी, जेवली, मुरली व अनेक खेडया गाव भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली, त्यामुळे पैनगंगा नदी दुथडी वाहत असल्यामुळे छोटे मोठे नाल्याचे पाणी पैनगंगा नदी घेत नसल्यामुळे ते पाणी संपूर्ण शेत शिवारामध्ये तुडुंब साचत आहे, त्यामुळे संपूर्ण शेतकरी चिंतेत असल्याचे दिसत आहे, उमरखेड तालुक्यातील पेरण्यामध्ये घसर पसर झाल्यामुळे नदीकाठची पिकं अगदी छोटी छोटी आहेत, पण गेल्या सहा दिवसाच्या संततधार अतिवृष्टीमुळे या सर्व गावाची पिकं तुडुंब पाण्यामध्ये असल्यामुळे कोवळी पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, अशा परिस्थितीत काय करावे ते बळीराजाला कळेनासे झाले आहे, आधीच अठरा विश्व दारिद्र्य भोगत असलेल्या बळीराजाच्या पोटाला भाकर असूनही नसल्यागत अवस्था झाल्याने पुढे काय करायचे व काय होणार,,,? विवंचनेत संपूर्ण शेतकरी आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे अशा जमिनीचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे, तरी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी असा टाहो शेतकरी बांधवांकडून ऐकण्यास मिळत आहे,

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!