रेशन दुकानदारांची मनमानी, लाभार्थ्यांची झोळी रिकामी.
रेशन दुकानदारांची मनमानी, लाभार्थ्यांची झोळी रिकामी,
शासनाच्या अध्यादेशाला केराची टोपली.
श्रीक्षेञ माहूर – नितीन तोडसाम
अतिवृष्टीने कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकर्यासह शेतमजुराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.त्याच बरोबर वाढत्या महागाईमुळे भाजप सरकारवर टीकेची झाेड उठत असताना सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातूनदेखील गाेरगरिबांना दिलासा देण्यासाठी पावले उचलली जात नसल्याची धक्कादायक बाब माहूर शहरात उघडकीस आली आहे.
श्रावण मासाला सुरुवात झाली असताना माहूर शहरातील रास्त धान्य दुकान क्रमांक ११४ श्रीमती साधनाबाई जोशी या दुकानदारांकडून धान्याबाबत नकारघंटा वाजवली जात आहे. ज्या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. त्या आदेशाला तिलांजली देऊन आपल्या साेयीप्रमाणे दुकाने उघडण्याचे मनमानी धाेरण राबवले जात आहे. परिणामी दुकानदारांची वाट पाहण्याची वेळ सामान्य लाभार्थीवर आली आहे. रिकाम्या हाती परत गेलेल्या लाभार्थ्यांनी दुकानदारांशी संपर्क साधल्यास तुम्ही वेळेत येत नाहीत म्हणून धान्य उद्याला घेवून जा, अशी उत्तरेही देऊन ग्राहकांना माघारी पाठवले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
राज्यावर ओढावलेल्या अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे ऐन सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना चढ्या दराने जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. या अडचणींमध्ये रास्त धान्य दुकानांच्या अनागोंदी कारभाराची भर पडत आहे.शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे नागरिकांच्या सुविधेसाठी रास्त धान्य दुकाने सकाळी ९ ते १२ दुपारी २ ते ५ दुकाने खुली ठेवून लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्याचा नियम आहे. मात्र माहूर शहरातील व तालुक्यातील बहुतांश रेशन दुकानदार नागरिकांच्या अडचणी वा कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता सवडीनुसार दुकाने सुरू ठेवत असल्याच्या तक्रारी सातत्याने नागरिकातून केल्या जात आहे. दुकानदारांच्या या मनमानीमुळे नागरिकांना धान्य मिळण्यासाठी दुकानासमोर तासन्तास ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. दुकान कधी सुरू होणार याची माहिती नसल्याने लाभार्थ्यांना हक्काचे धान्य मिळविण्यासाठी या दुकानांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.