लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित जागेला नाहरकत प्रमाणपत्र देण्यास ग्राम पंचायतचा खोडा चालगणी ग्रामस्थांचे पं स समोर आमरण उपोषण.

youtube

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित जागेला नाहरकत प्रमाणपत्र देण्यास ग्राम पंचायतचा खोडा

चालगणी ग्रामस्थांचे पं स समोर आमरण उपोषण

उमरखेड : तालुक्यातील चालगणी येथील मातंग समाज बांधवांनी सन १९९१ पासून संपूर्ण महाराष्ट्राचे भुषण जगविख्यात साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचे नावाने गावातील जागेवर झेंडा रोवून तेथे अण्णाभाऊ साठे जयंती पुण्यतिथी तसेच महापुरुषांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी विविध सामाजिक कार्यक्रम 30 वर्षापासून घेत असतांना मात्र स्थानिक ग्राम पंचायतकडून सदर राखीव जागेला अधिकृत परवानगी देण्यास ग्राम पंचायत कडून अडथळा निर्माण होत असल्याने विविध योजना तसेच कार्यक्रम राबविण्यासाठी सदर जागेला अधिकृत परवानगी देऊन गाव नमुना ८ द्यावा यासाठी दि . २८ सप्टेंबरपासून चालगणी येथील नागरिकांनी पंचायत समिती समोर आमरण उपोषण आरंभिले आहे .
चालगणी येथील नियोजित जागेवर 30 वर्षापासून अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने झेंडा रोवून तेथे समाज बांधवांकडून नित्यनेमाने अण्णाभाऊ साठे जयंती , पुण्यतिथी तसेच विविध सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम दरवर्षी राबविले जातात परंतु या जागेला स्थानिक ग्राम पंचायतने मात्र अद्याप अधिकृत गाव नमुना ८ मध्ये नोंद घेऊन मान्यता दिलेली नाही . याबाबत समाज बांधवांकडून स्थानिक ग्राम पंचायतला वारंवार तोंडी लेखी निवेदने देऊनही ग्राम पंचायतने गोरगरिब समाज बांधवांच्या निवेदनाची दखल घेतली नाही . त्यामुळे सदर जागेवर समाज मंदीर , सभागृह उभारण्यास व विकसित करण्यास ग्राम पंचायत कडून अडथळा निर्माण होत असल्याने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा यासाठी चालगणी येथील संजय वंजारे , दत्ता वंजारे , गजानन वंजारे, नामदेव वंजारे , दिगंबर काळे, अनिल वंजारे, प्रकाश वंजारे , शिवशंकर वंजारे , विनोद काळे, संदिप वंजारे , प्रकाश वंजारे आदिंनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण आरंभिले आहे .

Google Ad
Google Ad

2 thoughts on “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित जागेला नाहरकत प्रमाणपत्र देण्यास ग्राम पंचायतचा खोडा चालगणी ग्रामस्थांचे पं स समोर आमरण उपोषण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!