नंददीप फाउंडेशन व साॅफ्ट बाॅल असोसिएशन ने पार पाडला अंतिम संस्कार.
नंददीप फाउंडेशन व साॅफ्ट बाॅल असोसिएशन ने पार पाडला अंतिम संस्कार
यवतमाळ…
सुभाष वाघमारे नामक इसम आर्णी रोड येथे तीन दिवसापासून पडून होता.हजारो लोक त्या पडलेल्या इसमाकडे पाहत होते, परंतु त्याची अवस्था पाहुन त्याची मदत करायला कोणीही हिंमत करीत नव्हता. तेवढ्यातच मयूर लंगोटे यांचं त्यांच्यावर लक्ष गेलं,त्यांनी नंददीप फाउंडेशनशी संपर्क केला.क्षणाचाही विलंब न करता नंददीप फाउंडेशन व यवतमाळ जिल्हा साॅफ्टबाॅल असोसिएशन चे खेळाडू निशांत सायरे,अक्षय बानोरे, नंदादीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे, स्वप्निल बागवाले त्या ठिकाणी पोहोचले व त्या रुग्णास तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. सुभाष वाघमारे यांचा पाय पूर्णपणे सडला होता.असह्य असा वास त्यांच्या शरीरातुन येत होता.अशा परीस्थितीत सुद्धा त्यांच्यावर योग्य ते उपचार करून त्यांना रुग्णालयात दाखल केले.त्यानंतर दहा दिवसांनी सुभाष वाघमारे यांची प्राणज्योत मालवली. मृत सुभाष वाघमारे यांच्या नातेवाईकांचा शोध अवधूत वाडी पोलीस स्टेशन मार्फत सुरू झाला परंतु बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध न लागल्यामुळे अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय राठोड व पोलीस शिपाई शेख तसेच नंदादीप फाउंडेशनचे सचिव स्वप्निल बागवाले,यवतमाळ जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन खेळाडू अक्षय बानोरे, निशांत सायरे, कृष्णा मुळे, स्वप्नील सावळे यांनी मृतदेहावर अंतिम संस्कार केले.