उमरखेड येथे ईद ए मिलाद उत्साहात साजरी – व जिजाऊ बिग्रेट कडुन पाणी व बिस्कीटाचे वाटप घडले ऐकतेचे दर्शन.
उमरखेड येथे ईद ए मिलाद उत्साहात साजरी – व जिजाऊ बिग्रेट कडुन पाणी व बिस्कीटाचे वाटप
घडले ऐकतेचे दर्शन.
उमरखेड/प्रतिनिधी : उमरखेड शहरात ईद ए मिलाद उर्फ मोहम्मद पैगंबर(स.) जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी दरवर्षी निघणारा जुलूस यावेळेस हजारोच्या उपस्थित आठवडी बाजार परिसरातून निघाला. जुलूस असंख्य लोकांची उपस्थित होती.
सकाळी 9 वाजता हजरत तातार शाह बाबा यांच्या दर्गावर सिरत कमिटी तर्फे फुलांची मानाची चादर अर्पित करून फतेहा देऊन जुलूस आरंभ करण्यात आले. जुलूस मार्गक्रम होत असतांना जिजाऊ बिग्रेड च्या जिल्हा अध्यक्ष सरोज देशमुख व सोबत सुमन वानखेडे, नंदा तावडे , जिजाऊ ब्रिगेड ता, सचिव शोभा राऊत, सुरेखा पवार, सपना चोधरी , सागर शिंदे, या सगळ्या जिजाऊनी पाणी व , बिस्कीट चे वाटप केले. जुलूस शांततेत पार पडले असून पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.
तांबोळी पुऱ्यात घडले हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
उमरखेड च्या प्रसिद्ध शिव मंदिरासमोरून जुलूस जात असतो. यावेळी उपस्थित हिंदू बांधवानी जुलूस मध्ये उपस्थिताना गुलाबाचे फुल देऊन ईद च्या शुभेच्छा दिल्या. उमरखेड शहरात हिंदू मुस्लिम बंधुभाव कायम रहावे या साठी शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना नेहमी पुढाकार घेत असतात.




I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article. https://accounts.binance.info/en-ZA/register-person?ref=B4EPR6J0
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?