उमरखेड : मरसुळ तलावाजवळ लवकरच वनउद्यान होणार ! = भाजपा जिल्हाध्यक्ष भुतडा यांच्या मागणीनंतर प्रस्ताव सादर करण्याचे वनमंत्र्याचे आदेश.
उमरखेड : मरसुळ तलावाजवळ लवकरच वनउद्यान होणार !
= भाजपा जिल्हाध्यक्ष भुतडा यांच्या मागणीनंतर प्रस्ताव सादर करण्याचे वनमंत्र्याचे आदेश =
प्रतिनिधी
उमरखेड :
उमरखेड तालूक्यात सहा तलाव बऱ्याच वर्षापासून झालेली असून जंगलातील तलावाच्या बाजूला एका वन उद्यानाची निर्मितीही झाली आहे . अशातच तालूक्यातील सर्वात मोठया मरसुळ गावालगतच्या तलावाजवळ वन उद्यान करण्यात यावे अशी मागणी आज भाजपा यवतमाळ जिल्हाअध्यक्ष नितिन भुतडा यांनी वने , सांस्कृतिक कार्य मत्स व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केल्याने लवकरच मरसुळ तलावाजवळ वनउद्यान होणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मागणी करताच मरसुळ तलावाची पाहणी करण्याचे व प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी वनमंत्री यांनी संबंधीत प्रधान सचिवाला दिले असल्याने उमरखेड तालूक्यात पर्यटनाच्या बाबतीत हा एक मोठा प्रकल्प उभा राहणार आहे .
तालूक्यात दराटी , निंगणुर, पोफाळी , अंबोना , मरसुळ व चिल्ली असे सहा तलाव असून यामधील केवळ अंबोना तलावाचा विकास तथा तिथे वन उद्यानाची निर्मिती झाली आहे .दराटी , अंबोना, निंगणुर, मरसुळ हे तलाव जंगलाला लागून असून हे चारही तलावाची पाणी क्षमता अधिक असल्याने या खालील शेतजमीन ही शेकडो हेक्टर शेतीमध्ये मोडते . शेतकऱ्यांना या तलावांच्या पाण्याचा लाभ तर होतोच मात्र पूर्ण क्षमतेने हे तलाव भरल्यानंतर इथे पर्यटकांची गर्दिही वाढते . त्यामुळे मरसुळ तलावा जवळच जंगलात निसर्गरम्य वातावरणात वन उद्यान दिल्यास पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी वन उद्यान उभारण्यात यावे अशी मागणी भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली असून तात्काळ पाहणी करुन अहवाल व प्रस्ताव देण्याचे आदेश प्रधान सचिवाला वनमंत्र्यानी दिल्याने उमरखेड तालूक्यातील पर्यटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत .
चौकट :
अंबोना तलाव उमरखेड शहराला लागून असून तिथे नयनरम्य वातावरण असल्याने वन उद्यान उभारण्यात आले . मात्र मरसूळचा तलावही जंगलात आहे तिथे निसर्गाने भरभरून सौदर्य दिले आहे . आज रोजी कुठलिही सुविधा तिथे नसतांना दरवर्षी हजारों पर्यटक तिथे भेट देतात अशातच तिथे तलावाला लागून वन उद्यान झाल्यास पर्यटकांचा आनंद द्विगुणीत होणार आहे .
नितिन भुतडा
भाजपा जिल्हाध्यक्ष , यवतमाळ
I like this web blog very much, Its a very nice billet
to read and obtain info.Raise blog range