पैनगंगा अभयारण्यातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार ! = वनविभागाच्या नाहरकतीसाठी प्रधान वन सचिवासोबत बैठक.

youtube

पैनगंगा अभयारण्यातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार !
= वनविभागाच्या नाहरकतीसाठी प्रधान वन सचिवासोबत बैठक

प्रतिनिधी
उमरखेड :

तालूक्यातील पैनगंगा अभयारण्यातील लहान मोठी पन्नासच्या जवळपास रस्त्यांची समस्या ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून असून रस्त्याअभावी अभयारण्यातील नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहे .पैनगंगा अभयारण्यातील रस्त्यासंदर्भात मुख्य अडचण ही वनविभागाच्या नाहरकत संदर्भाने असून आज दिनांक १२ रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशावरून राज्याचे प्रधान वन सचिव यांच्या दालनामध्ये आमदार नामदेव ससाने, भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा यांच्यासमवेत महत्वपूर्ण बैठक झाल्याने पैनगंगा अभयारण्यातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची आशा पल्लवित झाल्या आहेत .
राज्याचे प्रधान वन सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्या दालनात झालेल्या बैठकीतअभयारण्यातील रस्त्यांच्या संदर्भात वनविभागाची ना हरकत मिळावी यासाठी काय करता येईल यावर मंथन झाले . तर रस्त्या अभावी जवळपास ३५ खेडयातील नागरिकांना दळण- वळणासाठी , आरोग्याबाबत रस्त्याअभावी अनेकांचे प्राण गेल्याचे यावेळी प्रधान सचिवांच्या निदर्शनास भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा यांनी आणून देत अभयारण्यातील रस्त्यांच्या समस्या मांडून कोणत्याही परिस्थितीत वनविभागाकडून ना हरकत देण्यात यावी अशी भुमिका मांडली. यावेळी प्रधान वन सचिव रेड्डी यांनी या विषयावर मुख्य वनसंरक्षक नागपुर , वनसंरक्षक यवतमाळ यांचेशी दुरध्वनीवरून चर्चा करून माहिती घेतली . तर येणाऱ्या आठवडयामध्ये अधिक्षक अभियंता सां . बा . विभाग , डिएफओ पांढरकवडा वन्यजीव विभाग यांची आमदार ससाने, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा हे संयुक्त बैठक घेवुन रस्त्याचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकाकडे पाठविण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत तशा सुचनाही प्रधान सचिवाने या दोन्ही वनअधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्यामुळे प्रस्ताव गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री , वनमंत्री , दोन्ही विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे प्रस्ताव जाणार असल्याने या सर्व विषयाला मंजूरात मिळण्याची शक्यता बळावली आहे . त्यामुळे अनेक वर्षापासून पैनगंगा अभयारण्यातील रस्त्यांचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार अशी अपेक्षा रस्त्याअभावी नरकयातना भोगणाऱ्या नागरिकांना लागली आहे .

चौकट :
अभयारण्यातील रस्त्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक प्रधान वन सचिवांसोबत झाली असून त्यांना रस्त्या संदर्भातील उद्भवणाऱ्या सर्व अडचणी सांगीतल्या आहे. येत्या शुक्रवारला तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत यवतमाळ येथे बैठकीत आमदार ससाने हे चर्चा करणार असून लवकरात लवकर रस्त्यांचा प्रस्ताव पाठविण्यासाठी आम्ही शंभरटक्के पाठपुरावा करणार आहोत . त्यामूळे दिपावलीनंतरच्या दोन्ही प्रधान सचिव व दोन्ही विभागाच्या मंत्र्यांच्या बैठकीत मंजूरात मिळेल असा आशावाद आहे .
नामदेव ससाणे
आमदार , उमरखेड महागाव विधानसभा

१ ]प्रधान वन सचिव रेड्डी यांचेशी चर्चा करतांना
२] पैनगंगा अभयारण्यातील परोटी गावाला जोडणारा रस्ता

Google Ad
Google Ad

1 thought on “पैनगंगा अभयारण्यातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार ! = वनविभागाच्या नाहरकतीसाठी प्रधान वन सचिवासोबत बैठक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!