बिटरगाव पोलीसांची धमाकेदार कार्यवाही शेतात गांज्याची लागवड करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेडया तब्बल १६,२०,००० / रू चा मुद्देमाल जप्त.

youtube

बिटरगाव पोलीसांची धमाकेदार कार्यवाही
शेतात गांज्याची लागवड करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेडया तब्बल

१६,२०,००० / रू चा मुद्देमाल जप्त

उमरखेड : –

15 ऑक्टोंबर रोजी प्रदिप पाडीवी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांना गुप्त खबऱ्या कडून मिळालेल्या माहितीवरून माहीतीवरुन आरोपी १) आनंदाराव गोवर्धन जाधव २) उल्हास रतन जाधव दोन्ही रा. संतोषवाडी (निंगनुर) ता. उमरखेड यांनी त्यांचे शेतामध्ये अवैधरित्या गांज्या वनस्पतीची लागवड केलेली आहे. अश्या खबरीवरून सदर खबरेची वरीष्ठांणा माहीती देवुन कार्यवाहीची पुर्ण तयारी करून कार्यवाही पथकासह आरोपी याचे शेतात संतोषवाडी येथे जावुन कार्यवाही केली असता दोन्ही आरोपी शेतात मिळुन आले. शेतीची पाहाणी केली असता शेतातध्ये तुर व कापसाची लागवड करून शेतामध्ये तुर व कापसाचे मध्ये गांज्या लागवड केल्याचे दिसुन आले. सदर झाडांचा पचासमक्ष पचनामा केला करून दोन्ही आरोपी चे शेतातील पोलीस स्टॉफचे मदतिने २७७ गांज्याची झाडे वजन २६६ किलो किमंत १६,२०००० रू करून पंचासमक्ष सील करण्यात आले. करून माल जप्त केला. पोलीस स्टेशन बिटरगांव येथे पोउपनि कपील म्हस्के यांचे फिर्याद वरून अप.न. २८५ / २०२२ कलम २० एन.डी.पी.सी अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करून दोन्ही आरोपी याना सदर गुन्हयात अटक करण्यात आली. सदर ची कार्यवाही ही डॉ. दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधिक्षक यवतमाळ, खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ. प्रदिप पाडावी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनामध्ये ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस, नायब तहसीलदार वैभव विठठल पवार, पोउपनि कपील म्हस्के, पोना गजानन खरात, रवि गिते, मोहन चाटे, विध्या राठोड पोकॉ सतिष चव्हाण, दत्ता कुसराम, निलेश भालेराव, मोहसीन पठाण, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील स.फौ. रवि मोहन आडे पोलीस स्टेशन महागाव चे पो हवा .मुन्ना आडे, मोजमाप अधिकारी शंकर हरणे, व उमरखेड येथील आरसीपी पथक होमगार्ड चंद्रमणी वाढवे, जिवन महाजन यानी केली. पुढील तपास हे वरीष्ठांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस करीत आहेत.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!