दोन वर्षा पासुन बेपत्ता अपंगाला मिळाला आपला परीवार.

youtube

दोन वर्षा पासुन बेपत्ता अपंगाला मिळाला आपला परीवार

यवतमाळ
नंददीप फाउंडेशन व सेवा समर्पण प्रतिष्ठान बेघर मनोरुग्न निवारा केंद्र यवतमाळ यांच्या मदतीने एका बेवारस अपंग यवतमाळ जुने बस स्टँड येथे फिरत असलेल्या संपूर्ण शरीराने अपंगाला मिळाले स्वतःचे घर काही दिवसापूर्वी संकल्प फाउंडेशन चे रवी ठाकूर व विनोद दोंदल यांना बस स्टॉप परिसरामध्ये आढळून आलेला बेवारस अवस्थेत अपंग उपाशीपोटी दिसून आला त्यांनी आपल्या यवतमाळमध्ये चालू झालेल्या बेघर मनोरूग्ण निवारा केंद्र येथे आणून सोडले व या अपंग निराधार बेघर झालेल्या निरागस चेहऱ्याला नंददीप फाउंडेशन व सेवा समर्पण प्रतिष्ठान बेघर मनोरुग्न निवारा केंद्राने आधार दिला रोजचे दानदात्यांच्या दानातून भोजन दिले व दानशूर यांनी दिलेले कपडे त्याला येत नव्हते तो अपंग असल्यामुळे त्याला मोठ्या माणसाचे कपडे होत नव्हते अशावेळी नंददीप फाउंडेशन ला सदैव मदत करणारे आदरणीय *पराजीया परिवाराने त्या व्यंकटेश ला दोन नवीन ड्रेस घेऊन दिले* व त्या अपंग व्यंकटेश ला नेसायला कपडे मिळाले आधार मिळाला रोजचे जेवण मिळाले वेंकटेश कधी बाहेर फिरायचा ग्राउंड मध्ये त्यावेळी फिरता फिरता दोन पाय त्याचे अपंग असताना तो घसरून पडायचा असा वेळी नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे धावत जाऊन त्याला उचलायचे त्याला रोज कपडे नेसून द्यायचे त्याची दाढी कटिंग करून द्यायची त्याला रोज जेवण द्यायचे
एके दिवशी त्याला आईची आठवण आली आणि नंददीप फाउंडेशनने व्यंकटेश च्या घरी सोडण्याची प्रोसेस सुरू केली बामणी पोलीस स्टेशन तालुका सिरोंचा जिल्हा गडचिरोली येथे असलेले महेंद्र चहांदे व रवीकूमार पोलीस स्टेशन बामनी यांच्या मदतीने परिवाराला फोन केला व त्यांना फोटो पाठवला आणि त्यांना सांगितले की त्याला आईची आठवण येत आहे त्यांच्या घराचा तुम्ही शोध लावा पोलीस विभाग गडचिरोली महिंद्र चहांदे यांनी बामणी पोलीस स्टेशनचा नंबर दिला बामणी पोलीस स्टेशनशी संपर्क झाला असता त्यांनी ताबडतोब त्यांच्या रोमपल्ली गावी जाऊन परिवारांना माहिती दिली ज्या *आईची आठवण करत असलेला व्यंकटेश ला माहिती नाही की त्याची आई कोरोनामध्ये दगावली मरण पावली ज्यावेळी त्याचा भाऊ यवतमाळ मध्ये आला आणि त्यांनी सांगितले की आई कोरोना मध्ये मरण पावली तो हळहळला त्याच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या* ज्या आईसाठी मी घरी जातो आहे ती आईच माझी संपली आहे जाऊ कुठे तरी वडील भाऊ माझा परिवार आहे दोन महिने अमरावती तर दोन महिने शेगाव तर यवतमाळ मध्ये पाच सहा महिने त्यांनी एका मित्राकडे काढले आणि तो मित्रही काही दिवसानंतर हरवला त्यावेळी बेघर झालेला हा व्यंकटेश संपूर्ण शरीराने अपंग असलेला व्यंकटेश बस स्टॉप वर असता त्याला संकल्प फाउंडेशनचे रवी ठाकूर व विनोद दोंदल यांनी नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे पोहोचवून मोलाचे कार्य पार पाडले* आणि आज 16 – 10- 2022 रोजी त्या व्यंकटेश तलांडी चे भाऊ शंकर सनी तलांडी यवतमाळ दाखल झाले आणि त्या व्यंकटेशची बिदाई पोलीस निरीक्षक अवधूतवाडी आदरणीय मनोज जी केदारे यांच्या समक्ष त्याच्या परिवाराच्या स्वाधीन केले त्याची घरची परिस्थिती एकदम चिंताजनक भावाजवळ एकही रुपया नव्हता जाऊ कसा घरी हा विचार त्याला पडला मागु कसे पैसे हा विचार त्याला पडला असता नंददीप फाउंडेशन ला मदत करणारे दानशूर दान दात्यांनी दिलेला विश्वास याच विश्वासाने नंददीप फाउंडेशन यांनी आपल्या संस्थेमध्ये दान दिलेल्या दानातून दोन हजार रुपये त्या वेंकटेशच्या हातात दिले आणि ही परिस्थिती अवधूत वाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांना माहित पडली असता त्यांनी लगेच खिशात हात घातला आणि पाचशे रुपये व्यंकटेश ला मदत दिली.आणि अपंग वेंकटेश सनी तलांडी यांच्या हातात दिले त्यावेळी बिदाई करताना आणि इतके पैसे तो पाहून त्याला वाटले की हाच माझा आधार हेच माझे यवतमाळकर यवतमाळ चे अधिकारी सुद्धा या कामात सर्वात पुढे असतात हेच यवतमाळचे भाग्य आहे यावेळी नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे नंदिनी शिंदे स्वप्निल बागवाले संजय वगारे आणि ननदीप फाउंडेशन ला सदैव मदत करणारे अनंतराव कौलगीकर गोविंदजी शर्मा रेमंड कंपनीचे मेन इन्चार्ज नितीनजी श्रीवास्तव व परिवार यावेळी उपस्थित होता व या आनंदाने सर्वांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या हे *पाहून शंकर तलांडी सुद्धा हळहळले त्याचेही डोळे भरून आले* आमच्या गडचिरोलीमध्ये अशी मदत कुठेही होत नाही असे शंकर तलांडे यांनी बोलून दाखविले आणि यवतमाळ अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार व नंददीप फाउंडेशन व सेवा समर्पण प्रतिष्ठान बेघर मनोरुग्न निवारा केंद्राचे आभार व्यक्त केले.

Google Ad
Google Ad

1 thought on “दोन वर्षा पासुन बेपत्ता अपंगाला मिळाला आपला परीवार.

  1. Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!