प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या करमाळा तालुक्याची आढावा बैठक संपन्न.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या करमाळा तालुक्याची आढावा बैठक संपन्न
करमाळा, सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची करमाळा तालुका शाखेची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविणार असल्याचे जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे यांनी प्रतिपादन केले.
या बैठकीत वर्षभरात घेण्यात आलेल्या सर्व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. भविष्यात संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्य उत्कृष्ट पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार करण्यात आला. संघाचे कार्य उत्कृष्ट पद्धतीने करुन सोलापूर जिल्हात नावलौकिक करु असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ आशाताई चांदणे यांनी आढावा बैठकीत सांगितले.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा सचिव प्रमिला जाधव, करमाळा तालुका अध्यक्ष बाळासाहेब भिसे,जेऊर शहर अध्यक्ष आबासाहेब झिंजाडे, संपर्क प्रमुख प्रमोद खराडे, तालुका सचिव प्रदिप पवार, तालुका सचिव ज्योती माने, सदस्य सौ. माधुरी कुंभार, संभाजी शिंदे, सचिन नवले, संजय चांदणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.