भावी शिक्षिकेचे पोलीस बनण्याचे स्वप्न अधुरेच दोन दिवस मृत्यूची झुंज.
भावी शिक्षिकेचे पोलीस बनण्याचे स्वप्न अधुरेच दोन दिवस मृत्यूची झुंज
उमरखेड :
पदवी सह डीएड शिक्षण घेऊनही शिक्षक भरतीच नसल्यामुळे चला पोलीस भरती आहे त्यामुळे आपण शिक्षक तर नाही पोलीस होऊन तरी आपल्या कुटुंबाला आधार द्यावा या हेतूने पोलीस होण्यासाठी प्रयत्न करणारी कु . राजनंदिनी (वय 24 )दोन दिवस मृत्यूची झुंज देण्यास अपयशी ठरली . तालुक्यातील बेलखेड या गावची रहीवाशी असणारी कु . राजनंदिनी नामदेव काळबांडे ही भगवती हॉस्पिटल नांदेड येथे गुरुवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान मृत्यूशी झुंज देत तीने अखेरचा श्वास घेतला . बेलखेड येथील अल्प भुधारक शेतकरी नामदेव गोविंदराव काळबांडे यांची ही राजनंदिनी कन्या तिने मिलिंद महाविद्यालय मुळावा येथे बीए चे शिक्षण घेतले त्यानंतर तिने डीएड अभ्यासक्रम पूर्ण केला . शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहत असताना कुठेही शिक्षक भरती नसल्यामुळे तिने पोलीस होण्याचे तयारी केली त्या साठी तीदररोज व्यायामा सह कसरती करू लागली . घटनेच्या दिवशी ती आपल्या गावातील मुलीसह बेलखेड परिसरातील टेकड्यावर धावण्याचा सराव करत होती . चार फेऱ्या परिसराला मारल्यानंतर पाचवी फेरी मारत असताना अचानक तिला घाबरल्या सारखे वाटले . शरीर घामाघूम होऊन काही कळायच्या तीआपत्ती बेशुद्ध पडली . तिची ती अवस्था पाहून सोबत असणाऱ्या मुलींनी व तिच्या नातेवाईकांनी तिला त्या अवस्थेमध्ये घरी आणले . त्यानंतर ताबडतोब उमरखेड येथील डॉ .पत्रे यांच्या रुग्णालयात जवळपास तीन तास शर्थीचे उपचार केले .परंतु परिस्थिती अधिकच गंभीर बनत असल्यामुळे तिला नांदेड येथे हलवण्यात आले . तेथील भगवती हॉस्पिटलमध्ये डॉ . अंकुश देवसरकर व त्यांच्या टीम नीतीला मृत्यूच्या दाढेतून काढण्याचे शर्तीचे प्रयत्न केले . परंतु तिला वाचविता आले नाही . गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान तीचा मृत्यू झाला . भावी शिक्षक होण्याची अंगी पात्रता असूनही शिक्षक भरतीच नसल्याने हताश न होता पोलीस होऊन तरी कुटुंबाचा आधार व्हावा या हेतूने प्रयत्न करणाऱ्या राजनंदिनी चे स्वप्न शेवटी अधुरीच राहिले .तिची आई अंगणवाडी सेविका असून एक भाऊ शेतकरी आहे तर दुसरा भाऊ स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करीत आहे .तिच्या अकाली जाण्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . ( सोबत फोटो )