पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 298 वी जयंती साजरी.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 298 वी जयंती साजरी
हिंगोली –
येथील बसस्थानक परिसरात आज दिनांक 31 मे रोजी सकाळी 10 वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 298 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा. गजानन हाके गोळेगावकर यांच्या वतीने हिंगोली येथील बसस्थानकात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा भेट दिली. याप्रसंगी बापुराव घोडगे, शिवाजी पातळे, विलास आघाव, विनोद सोन्नर, निलेश दराडे, महेश राखोंडे, विश्वजीत घोडगे, शैलेश खंदारे, सचिन पोले, नागेश तेलंग, बालाजी कुरवाडे, राजू होळपात्ते, स्वप्नील होळपात्ते, सोनाजी चव्हाण, अमोल सोरटे, विवेक पोले, यांच्या सह समाज बांधवांची उपस्थिती होती.
त्यावेळी श्री गजानन हाके यांनी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर माहिती देत असताना जगाला एक उत्तम प्रशासक, एक प्रजावत्सल लोकमाता, एक आदर्श राज्यकर्त्या, एक मराठेशाहीतील सुवर्ण काळाच्या निर्मात्या ,एक स्त्रीत्वाचे जोखड झुगारून देऊन प्रचंड त्याग व विश्वासाने राज्यकर्त्या आणि शिस्तप्रिय शासक म्हणून जगभर त्यांची ओळख आहे
शाहीर प्रभाकर
लिहितात
धन्य धन्य कलियुगी देवी अहिल्याबाई
गेली कीर्ती भूमंडळाचे ठायी
महाराज अहिल्याबाई पुण्यप्राणी
संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्नखाणी
इथे स्त्री आणि पुरुष सर्वांनाच प्रेरणा देण्यात आली आहे, स्त्रियांनी अहिल्यादेवींची मानसिक कणखरता अवश्य लक्षात घ्यावी, रडत बसण्यापेक्षा लढत जगावे