अवैध हातभट्टी व देशीदारू यावर ठाणेदार सुजाता बनसोड यांची बेधडक कारवाई [बिटरगाव पोलीस स्टेशन येथे रुजू होताच पहिली कारवाई.]
अवैध हातभट्टी व देशीदारू यावर ठाणेदार सुजाता बनसोड यांची बेधडक कारवाई
[बिटरगाव पोलीस स्टेशन येथे रुजू होताच पहिली कारवाई.]
ढाणकी/ प्रतिनिधी :
नुकताच बिटरगाव पोलीस स्टेशनचा एपीआय सुजाता बनसोड यांनी चार्ज घेतला, आणि आज बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शेख इस्माईल शेख मस्तान, मीराबाई दीपक कांबळे दोन्ही राहणार टेंभेश्वरनगर, ढाणकी या अवैध देशी दारू विक्रेते व कुशीबाई आनंदा राठोड राहणार मन्याळी या हातभट्टी विक्रेत्या व कैलास बाबुराव मोरे राहणार ईसापुर हे हातभट्टी विक्रेते, या चारही लोकांवर, चार वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून बेधडक कारवाई केली. यामध्ये एकूण ५१७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोषींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे, कलम ६५ (ई) गुन्हे दाखल करण्यात आले.
ही कार्यवाही ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार मोहन चाटे,बीट जमादार गजानन खरात, बीट जमादार विद्या राठोड, पोलीस कॉन्स्टेबल निलेश भालेराव, दत्ता कुसराम, प्रकाश मुंडे, जाधव, चालक फिरोज काझी व होमगार्ड वाढवे यांनी केली.