शेगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा प्रवचन, मार्गदर्शन व दर्शन सोहळा उत्साहात संपन्न.
शेगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा प्रवचन, मार्गदर्शन व दर्शन सोहळा उत्साहात संपन्न
शेगाव (प्रतिनिधी ) जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा रविवार दि. 16 व सोमवार दि. 17 जुलै रोजी श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालय, पुरुषोत्तम हरी पाटील नगर, एम. एस. ई. बी. चौक खामगाव रोड, शेगांव जि. बुलढाणा येथे दोन्ही दिवस अतिशय उत्साह मध्ये संपन्न झाला. उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना जगद्गुरु श्रींनी सांगितले की, विज्ञानाने केली क्रांती तरी, अध्यात्माशिवाय नाही मन:शांती! आपली दृष्टी विज्ञानवादी ठेवा, बुद्धी व्यवहारवादी असू द्या, मन मात्र अध्यात्मावादी ठेवा. या त्रीसूत्रीने जीवन जगल्यास नक्कीच आपण समाधानाने जीवन जगू शकतो. तसेच, मानवता हा धर्म पाळा, स्वप्नातही दुसऱ्याचे वाईट चिंतू नका, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा या दिव्य संदेशानुसार समाजातील दुःख पीडितांची मदत व सेवा केल्यास नक्कीच भगवंत आपल्यावर प्रसन्न होईल आणि तीच खरी भगवंताची सेवा आहे. “माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी ” याप्रमाणे गुरुचरणी तन मनाने समर्पित भावनेने सर्वस्व अर्पण केल्यास नक्कीच गुरु प्रसन्न होतील आपल्याला वेगळं मागण्याची काहीच आवश्यकता तो तुमची झोळी कधीच रिकामी होऊ देणार नाही असे सांगून सध्याच्या युवा पिढी यांनी अध्यात्म व धर्म पूर्णतः जाणून घेऊन आपल्या धर्माची नीतिमूल्य जोपासावी, पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधाणूकरण टाळावे, शिक्षण घेता घेता सुसंस्कारीत व्हावे असे प्रतिपादन जगद्गुरुश्रींनी केले. या कार्यक्रमासाठी अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांसह नांदेड, औरंगाबाद, हिंगोली ,परभणी इत्यादी जिल्ह्यांमधून जवळपास 23 ते 25 हजार भाविक दर्शनासाठी व प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते. याच कार्यक्रमात साधक दीक्षा चा कार्यक्रम सुद्धा अतिशय सुंदर रित्या संपन्न झाला.श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालयापासून ते शेगाव रेल्वे स्टेशन पर्यंत लांबच लांब भक्तांच्या रांगा दर्शनासाठी लागलेल्या होत्या. जगद्गुरु श्रींच्या दर्शनासाठी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी जगद्गुरु श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. अशी माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे, पीठ सहप्रमुख श्री देवेंद्र दलाल, व्यवस्थापक श्री सुरेश मोरे, यवतमाळ पूर्व जिल्हा निरीक्षक गोविंद उपासे , सर्व जिल्हा निरीक्षक,जिल्हाध्यक्ष, पीठ समिती सदस्य यांनी दिली.
या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयासाठी आलेल्या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दोन्ही दिवस महाप्रसादाची व्यवस्था केलेली होती. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दोन्ही दिवस मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले. पंचक्रोशी मधील हजारो भाविकांनी उपस्थित राहून परम पूज्य जगद्गुरु श्रींच्या प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रम सेवा समिती विभाग प्रमुख व सेवेकरी, पिठ समिती सदस्य, जिल्हा निरीक्षक व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा समिती, तालुका समिती, सेवा केंद्र समिती, सर्व भक्त, साधक, शिष्य, गुरु सेवक, प्रवचनकार, महिला सेना, हिंदू संग्राम सेना, युवासेना, आजी – माजी पदाधिकारी, भाविक भक्त, कार्यकर्ते या सर्वांनी प्रचंड मे