धक्कादायक घटना दोन चिमुकल्यांना विष पाजून आईनेही घेतला विषाचा घोट तिघांचाही दुर्दैवी मृत्यू
धक्कादायक घटना दोन चिमुकल्यांना विष पाजून आईनेही घेतला विषाचा घोट
तिघांचाही दुर्दैवी मृत्यू
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला निंगनूर मध्ये हृदयद्रावक घटना
महागाव -१४ ऑगस्ट
प्रतिनिधी – संजय जाधव
आईने आपल्या दोन चिमुकल्या आपत्यांना विष पाजून स्वतःही विषाचा घोट घेतला. या दुर्दैवी घटनेत आईसह दोन्ही निरागस अपत्यांचा मृत्यू झाला. उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला घडलेल्या या हृदय द्रावक घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून उमरखेड तालुक्यावर शोककाळा पसरली आहे. सौ. रेशमा नितीन मुडे (वय २६) कु.श्रावणी नितीन मुडे (वय ६) आणि सार्थक नितीन मुडे (वय ३) अशी मृतकांची नावे आहेत. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रेशमा मुंडे यांनी आपल्या निरागस आपत्यांना विष पाजले आणि त्या नंतर स्वतः विष प्राशन केले अशी माहिती मिळाली आहे. काही वेळानंतर कुटुंबातील सदस्यांना ही बाब लक्षात आली. रेशमा, श्रावणी आणि सार्थक या तिघांनाही तातडीने सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु तोपर्यंत आई रेशमा आणि चिमुकल्या सार्थक चा मृत्यू झाला होता. अत्यावस्थ असलेल्या श्रावणीला पुढील उपचारासाठी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले परंतु तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे कळते. काळजाचे पाणी पाणी करणारी ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा खुलासा अद्याप होऊ शकला नाही मात्र यामागे वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. विष घेतल्यानंतर तिघांनाही सासरच्या लोकांनी सवना येथे उपचारासाठी आणले होते मात्र रेशमाच्या माहेरच्या लोकांना ही बाब कळाली आणि ते सवना येथे हजर झाले त्यानंतर सासरच्या लोकांनी तेथून पोबारा केला. आईने दोन्ही अपत्यांना विष पाजून स्वतः विष घेतल्यामुळे ही दुर्घटना घडली की या घटनेला आणखी कोणी जबाबदार आहे याविषयी शंका कुशंका व्यक्त होत आहेत.
Very interesting details you have noted, thanks
for posting.Raise your business