खा.चिखलीकरांच्या हस्ते अल्टामेड फार्मा ( मेडिकल एजन्सी )चे नांदेड येथे भव्य उद्घाटन.
खा.चिखलीकरांच्या हस्ते अल्टामेड फार्मा ( मेडिकल एजन्सी )चे नांदेड येथे भव्य उद्घाटन
नांदेड,(प्रतिनिधी)
नांदेड येथे
अजमत करिमभाई शेख व दत्ताभाऊ पावडे.यांच्या नविन अल्टामेड फार्मा च्या (मेडिकल एजन्सी)उद्घाटनचे अतिशय थाटात उद्घाटन समारंभ पार पडले.नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते फित भव्य दिव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
अल्टामेड फार्मा शिवनगर मालेगाव रोड नांदेड येथील उद्घाटन समारंभाला उपस्थित मान्यवरांचे दि.(१७) आगस्ट रोजी प्रथमतः अजमत करीम शेख व दत्ता शिवाजीराव पावडे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.तसेच जिल्हा भरातील अनेक मान्यवर मंडळीनी शेख व पावडे कुटुंबीयांना या प्रसंगी भेटून शुभेच्छा दिल्या.यावेळी नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी सौ.कल्याणकर मॅडम, नांदेड शहरातील ज्येष्ठ तज्ञ डॉ. जोशी,सतीशराव देशमुख (माजी महापौर)नांदेड,संजय पाटील कराळे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती नांदेड, बाळासाहेब पाटील कराळे उपजिल्हाप्रमुख शिवसेना,योगेश नंदनवनकर शिवसेना, सामाजिक कार्यकर्ते सय्यद भाई नांदेड हनुमंतराव लोंढे,लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार। सूर्यवंशी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा सिनेट सदस्य नवनाथ (बापू) चव्हाण, उपनगराध्यक्ष दत्ता भाऊ वाले,माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, लोहा तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, युवा नेते दीपक पाटील कानवटे मिलिंद पाटील पवार तालुका अध्यक्ष शिवसेना (शिंदे गट)पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, पत्रकार संजय कहाळेकर, पत्रकार रमेश पाटील पवार, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष हरिहर धुतमल, रत्नाकर महाबळे, सुरेश महाबळे,डि.एन.कांबळे, बाळासाहेब कतूरे पत्रकार शिवराज दाढेल लोहेकर आदीं नी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.