देशी दारूच्या दुकाना समोर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला .
देशी दारूच्या दुकाना समोर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल
उमरखेड प्रतिनिधी :
नांदेड रोड येथील दिलीप जयस्वाल यांच्या मालकीच्या देशी दारू दुकानासमोर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आज दि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता च्या दरम्यान आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेचार वाजता च्या दरम्यान सदर इसमाचे देशी दारु दुकानासमोर पडून असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये आले आहेत . सकाळी ८.३० वाजता तेथील कामगार दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या गेट समोर एका अज्ञात इसमाचा मृत्यू देह आढळल्याने कामगारांनी तात्काळ पोलिसांना कळविले त्याच क्षणी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाले असता अज्ञात मृत्यू देह येथील शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आले .
अद्यापही मूर्तकाची ओळख पटली नसून त्याच्या छातीवर आशा असे नाव गोंदलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले त्यामुळे सदर मृतदेह येथील शासकीय रुग्णातील फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय निलेश सरदार बीट जमादार संदीप ठाकूर करीत आहे .
I like this website it’s a master piece! Glad I noticed this
ohttps://69v.topn google.Expand blog