सुमेध बोदडे यांची विभागीय स्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड.
सुमेध बोदडे यांची विभागीय स्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड
निफाड ता :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या वातीने आणि नाशिक जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या सहकार्याने नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळा हॉलमध्ये नाशिक महाविद्यालयांच्या १९ वर्षे आतिल मुले आणि मुली यांच्या शालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निफाड तालुक्यातील क्रीडा सह्याद्री अकॅडमी चा खेळाडू सुमेध बोदडे याची जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल व त्याची विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे सुमेध बोदडे सध्या बारावीच्या वर्गात शिकत असून आत्तापर्यंत त्याने राष्ट्रीय विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ सुवर्णपदकाची कामगिरी केलेली आहे सुमेध बोदडे याची विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल
महाराष्ट्र टेनिस क्रिकेट सचिव मिनाक्षी गिरी ,क्रीडा सह्याद्री नाशिक अध्यक्ष व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव विलास गायकवाड, क्रीडा सह्याद्री सदस्य विनोद गायकवाड ,राऊल.कुलकर्णी ,चेतन कुंदे ,द्त्तू रायते ,श्याम चौधरी ,रमेश वडघुले ,,दिपक भोर, , प्रतिक्षा कोटकर, क्रिती कोटकर,लखन घडमाले, विजय घोटेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.क्रीडा प्रशिक्षक विलास गायकवाड यांचे मार्गदर्शन यांना लाभत आहे,