राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ मधील हलगर्जी खोदकामामुळे शेतकऱ्याचे सहा वर्षा पासुन सिंचन शेतपिकांचे नुकसान ; शेती पुस्स्कार प्राप्त अशोक वानखेडे ची शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी मागणी

youtube

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ मधील हलगर्जी खोदकामामुळे शेतकऱ्याचे सहा वर्षा पासुन सिंचन शेतपिकांचे नुकसान ; शेती पुस्स्कार प्राप्त अशोक वानखेडे ची शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी मागणी !

उमरखेड –
नागपूर – तुळजापूर महामार्ग क्र ३६१ लेवा – वारंगा जानार्‍या या रस्त्याचे काम सन २०१८ पासुन प्रत्यक्ष सुरु केले असतांना सुकळी ( ज ) येथाल राष्ट्रीय किसान प्रगत पुरस्कार प्राप्त शेतकरी अशोक वानखेडे यांची मालकी शेतजमीन राष्ट्रीय महामार्ग रस्ता कामात मधोमध विभागली गेली असतांना या जमीनीत नेहमी करिता उस उत्पादन घेत होते या शेताला सिंचन व्यवस्था म्हणून स्वत : च्या विहिरीतील पाईप लाईन केलेली होती हि पाईप लाईन पुर्वी शासनाकडुन परवानगी मिळऊन केली होती असे असतांना रस्ता काम करतांना हलगर्जीपणा करून त्यावेळच्या सदभाव या कंपनी कंत्राटदार यांनी पाईप लाईन तोडताड करुन शेती सिंचन सुविधा पुर्न : नेस्तानाबुत केली त्या मध्ये शेती पिकांचे सर्वेनंबर २२६ व २२७ मधील प्रचंड नुकसान झाले
शेतकरी अशोक वानखेडे यांनी कंत्राटदार यांच्या चाललेल्या मनमानी विरोधात २८ जानेवारी २०१९ मध्ये येथील तत्कालीन उपविभागिय महसुल अधिकारी स्वप्नील कापडनिस यांच्या कडे या बाबत रितसर तक्रार दाखल केली होती तेव्हा संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदार यांनी पुर्ववत पाईप लाईन त्याच पद्धतीत पूर्ववत ठेवून नव्याने दुरुस्ती करून देतो असे हमी पत्र देऊन सुद्धा आतापर्यंत वेळकाढू पणा केला , तेव्हापासुन आज पावेतो सलग ६ वर्ष पूर्ण होत असतांना अद्यापही मोडतोड झालेली पाईप लाईन आजही त्याच अवस्थेत असल्याने उस प्रति वर्षी एकरी ७ ० टन होऊन उसाचे होत असतांना अजता गायत ११ लाख २५ हजार रुपयाचे ओलीत शेती उस पिकांचे नुकसान झाले आहे याची चौकशी होणे तेवढेच महत्वाचे ठरते तेव्हा या मध्ये शेत सर्वे नंबर २२६ व २२७ मधील पर्ववत पाईप लाईन करून देऊन आता पर्यंत प्रति वर्षी शेती पिक उत्पादन ७० टन प्रमाणे १०० – ११० टन उसाचे उत्पादन होत होते त्या पोटी मिळणारे ११ लाख २५ हजार रुपये नुकसान तत्काळ देण्यात यावेत , या सर्व खचीकरणाला संबधीत कंत्राटदार जबाबदार असल्याचे हदबल असलेले शेतकरी अशोक वानखेडे यांनी पुन्हा शासनाकडे २१ डिसेंबर रोजी दिलेल्या उपविभागिय अधिकारी डॉ व्यकंट राठोड यांच्या कडे दिलेल्या नुकसानी भरपाई मागणी मिळणे बाबत च्या निवेदनातून म्हटले आहे
मला केंन्द्र शासनाने राष्ट्रीय प्रगत किसान पुरस्कार बहाल करून सन्मानित केले होते तो पुरस्कार मी त्या शासनाकडे परत करणार असल्याचे अन्याय ग्रस्त पुरस्कार प्राप्त शेतीमित्र अशोक वानखेडे यांनी अधिक माहिती देते वेळी म्हटले आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!