शिव जयंती निमित्त उदेश किल्ले बनवा स्पर्धेत बाल अभियंतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिव जयंती निमित्त उदेश किल्ले बनवा स्पर्धेत बाल अभियंतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरखेड –
शिव जयंती महोत्सव समिती च्या अंतर्गत उद्देश सोशल फाउंडेशन कडून आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धेत 75 ग्रुप च्या बालकांनी सहभाग घेतला, या स्पर्धेचे अकरावे वर्ष होता या स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद देत बालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी मोठे मोठे किल्ले बनवले होते, त्यांच्याच प्रतिकृती केले बालकांनी या स्पर्धेत हाताने कोरीव अशी किल्ले बनवले व बलके मग्न होऊन किल्ले बनवत असताना त्यांना भेट देण्यासाठी उमरखेडचे डी. वाय. एस पी हनुमंत गायकवाड यांनी बालकांना भेट दिली व जो तुम्ही किल्ले बनवले त्या संदर्भात त्यांच्याकडून माहिती विचारली बालकांनी प्रतिसाद देत संपूर्ण माहिती सांगितली.
यावेळी उपस्थित उद्देश फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक ठाकरे ,किल्ले बनवा नियोजन समितीचे संदीप कदम , महेश पानपटे , अनिल महामुने, वसंता सुरुशे , पवन शहाणे, मुकंदा पेशनवार, डॉ गोपाल देशमुख, अतुल पतेवार, सुधाकर पदुकने, आदी सदस्य नी सहकार्य केले.