आस्था स्पेशल ट्रेनने यवतमाळ वाशीम मधील 1600 रामभक्त अयोध्येकडे रवाना नितीन भुतडा यांनी दाखविली भगवी झेंडी.
आस्था स्पेशल ट्रेनने यवतमाळ वाशीम मधील 1600 रामभक्त अयोध्येकडे रवाना
नितीन भुतडा यांनी दाखविली भगवी झेंडी
यवतमाळ-/
दि.25 फेब्रुवारी रोजी पहाटे 5.30 वाजता धामणगाव रेल्वे स्थानकावरून अयोध्या या पवित्र धामकरिता आस्था स्पेशल ट्रेन रवाना झाली आहे. आ.मदन येरावार यांचे मार्गदर्शनात व यवतमाळ-पुसद जिल्हा समन्वयक नितिन भुतडा यांचे नैतृत्वात तब्बल सोळाशे श्रीराम भक्त घेऊन निघालेल्या आस्था स्पेशल ट्रेनला नितीन भुतडा यांनी भगवी झेंडी दाखवुन ट्रेन रवाना केली. यावेळी जिप चे माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, महामंत्री राजू पडगीलवार,पुसद जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा शिवानी गुगलिया,जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, प्रमोद बनगीनवार, विनोद जिल्हेवार,निखिल चिद्दरवार,अश्विन बोपचे, चिंतामण पायघन, सुजित रॉय,दत्ता राहणे प्रामुख्याने उपस्थित होते.
दि.25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान धामणगाव ते अयोध्या धाम हा परतीचा प्रवास नियोजित आहे.
आस्था ट्रेनचा धामणगाव- दर्शननगर असा तब्बल 1450 किलोमीटरचा प्रवास आहे. एकूण 1600 श्रीराम भक्तांना धामणगाव रेल्वे स्थानकावरून अयोध्या धाम कडे रवाना झालेल्या रेल्वेतील रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर जय श्रीराम..! जय जय श्रीराम..!! घोषणेने निनादला होता.
दि.24 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता धामणगाव रेल्वे स्थानकावर नितीन भुतडा यांनी रेल्वे अस्थापना व रेल्वे पोलीस प्रशासनाची बैठक घेतली. यात श्रीराम भक्तांच्या सुविधात्मक, सुरक्षात्मक बाबींविषयी काही महत्वाच्या सूचना त्यांनी प्रशासनास केल्या. यवतमाळ-वाशिम लोकसभेतील यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, पुसद,वाशिम व कारंजा या सहा विधानसभा मतदार संघातील सोळाशे प्रवासी भक्त प्रवास करीत आहेत.
आस्था ट्रेनमध्ये अयोध्येसाठी रवाना झालेल्या श्रीराम भक्तांची भोजन,निवास,दर्शन इत्यादी सर्व भौतिक,वैधकीय व्यवस्था उत्तरप्रदेश सरकारच्या वतीने अयोध्या धाम येथे करण्यात आली आहे.