मोरचंडी येथील सामूहिक वनहक्क समिती पुर्वी पासुन अस्तित्वात ; अन्य अस्तिवातील बोगस समितीचा सखोलपणे चौकशीत पर्दापाश होणार
मोरचंडी येथील सामूहिक वनहक्क समिती पुर्वी पासुन अस्तित्वात ;
अन्य अस्तिवातील बोगस समितीचा सखोलपणे चौकशीत पर्दापाश होणार !
अन्नत्याग आंदोलन उपोषणार्थी यांना गटविकास अधिकारी व वन्यजिव सहाय्यक अधिकारी यांच्या संयुक्त समन्वयातून उपोषणाची सांगता . . .
प्रतिनिधी / १४ एप्रील
उमरखेड –
तालुक्यातील डोंगराळ बंदिभागातील मोरचंडी येथील ग्रामसभे मार्फत ५ जानेवारी २०२२ तसेच १७ मे २०२३ या दोन्हीही दिनांकात दोन वेगवेगळ्या सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली असुन या बाबतीत खात्रीलायक सखोल पणाचा अहवाल प्रकल्प अधिकारी ऐकतात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आणि कनव्हर्जन समिती तालुका अध्यक्ष उमरखेड यांच्या कडे चौकशी अहवालाचे अवलोकन करुन पडताळणी केली जाणार असल्याचे गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे यांनी ठोस पणे मोरचंडी येथील वनहक्क व्यवस्थापन समिती यांना प्रत्यक्ष भेटी दरम्यान उपोषण मंडपात अनेक जणांच्या उपस्थितीत लेखी आश्वासन दिले आहे या वेळी वन्यजिव विभागाचे सहाय्यक वन अधिकारी उपस्थित होते
मोरचंडी येथील सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती यांनी १७ मे २०२३ रोजी ग्रामसभे मार्फत वन हक्क समितीची स्थापना करण्यात आली आहे उपरोक्त दस्ता ऐवजा मध्ये सरपंच व संबंधित ग्रामपंचायत चे तत्कालीन सचिव यांनी मुद्रांका मध्ये असलेल्या प्रतिज्ञा पत्रावरून याशिवाय इतर दस्ता ऐवजा वरून या आधी कोणत्याही प्रकारची सामूहिक वन हक्क समिती अस्तित्वात नसल्याचे निदर्शनात आलेल्या प्रतिज्ञा पत्रावरून कळाले आहे त्यामुळे सहाय्यक वन रक्षक यांनी केलेल्या चौकशीच्या आधारे १७ मे २०२३ रोजी झालेल्या ग्रामसभे मध्ये नियुक्त सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती ही काम करण्यास पात्र असल्याचे प्रतिज्ञा पत्रावरून व चौकशीच्या आधारे निदर्शनास येत आहे त्यामुळे सदर समिती पुढील कामकाज करण्या बाबत कोणत्याही प्रकारची अडचण नसुन ती योग्य आहे अश्या प्रकारचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, सहाय्यक वन रक्षक वन्य जीव पैनगंगा अभयारण्य उमरखेड, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, सरपंच, सचिव ग्रामपंचायत मोरचंडी आणि अध्यक्ष सामूहिक वन हक्क समिती मोरचंडी यांना येथील गट विकास अधिकारी प्रविण वानखेडे यांच्या कडुन अहवाल सादर करण्यात येणार आहे त्यामुळे निश्चितच डोंगराळ बंदिभागातील भागात अन्य वन हक्क व्यवस्थापन समिती शासनाची दिशाभूल करुन लाभ घेण्याचा प्रयत्न करत असेल तर या उपोषनाच्या माध्यमातून पर्दापाश होण्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.
मोरचंडी येथील सामूहिक वन हक्क समिती ला त्या भागातील कामे सुरु करण्यासाठी जाणीव पुर्वक दिरंगाई करीत असुन त्यामुळे वन ग्राम वासी हे सोई सवलती पासुन वंचित राहात आहे त्या मुळे त्यांच्यावर ऍट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करुन संबंधित आयुक्ता मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच कामे तात्काळ सुरु करावी ही प्रमुख मागणी समोर करुन माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर तसेच विजय खडसे यांच्या नेतृत्वात मोरचंडी येथील सामूहिक वन हक्क समितीच्या सदस्यांनी व गावातील नागरिकांनी स्थानिक वन विभागाच्या कार्यालयच्या समोर १२ एप्रिल पासुन अन्न त्याग आंदोलन सुरु केले होते १३ एप्रिल रोजी गट विकास अधिकारी प्रविण वानखेडे, वन्य जीव सहाय्यक वन अधिकारी भारत खेलबाडे यांनी उपोषनार्थी यांना ठोस लेखी आश्वासन दिल्या नंतर सुरु असलेले उपोषण ठोस आश्वासना नंतर सुटले या वेळी आमदार नामदेव ससाने यांनी उपोषनार्थी ची भेट अगोदर घेतली होती उपोषण सुटते वेळी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, विजय खडसे, सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष यादव वाघमारे, सचिव आत्माराम शेळके, संगीता पिंपळे, मिरा मेंढके, संदीप चव्हाण, भिमराव भरकाडे, कृष्णा मुंडाले, आणि भगवान टाकडा यांच्या सह मोरचंडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
Hi i think that i saw you visited my web site thus i came to Return the favore I am attempting to find things to improve my web siteI suppose its ok to use some of your ideas
What i do not understood is in truth how you are not actually a lot more smartlyliked than you may be now You are very intelligent You realize therefore significantly in the case of this topic produced me individually imagine it from numerous numerous angles Its like men and women dont seem to be fascinated until it is one thing to do with Woman gaga Your own stuffs nice All the time care for it up