बंदी भागातील मोरचंडी येथील वन हक्क समितीचे अन्नत्याग आंदोलन. ( माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर व माजी आमदार विजय खडसे यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलनाला आजपासून सुरुवात).
बंदी भागातील मोरचंडी येथील वन हक्क समितीचे अन्नत्याग आंदोलन.
( माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर व माजी आमदार विजय खडसे यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलनाला आजपासून सुरुवात).
उमरखेड ;(शहर प्रतिनिधी). ग्रामसभेतून गठित करण्यात आलेल्या सामूहिक वन हक्क समितीचे अधिकार वन हक्क समितीला प्रधान न करता बंदी भागातील मोरचंडी तालुका उमरखेड येथील आदिवासी ग्रामस्थांना वेठीस धरून सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव पैनगंगा अभयारण्य तथा विभागीय वन अधिकारी वन्यजीव पांढरकवडा यांच्याकडून वन हक्क कायदा अधिनियम 2006 आणि नियम 2008 मधील नियम (4)(1) ड” अनव्य सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे कायद्यामधील तरतुदीनुसार दिनांक 17 मे 2023 रोजी मोरचंडी येथे गठित करण्यात आलेल्या
सामूहिक वन हक्क समितीला शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या हक्कापासून आदिवासी लोकांना दूर ठेवत असून संबंधित अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे नोंदवून ग्रामपंचायत मोरचंडी ग्रामसभेच्या ठरावानुसार गठित करण्यात आलेल्या सामूहिक वन हक्क समितीला समितीचे हक्क तात्काळ प्रदान करण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव कार्यालय उमरखेड येथील कार्यालयासमोर मोरचंडी येथील महिला व पुरुष मंडळी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर व माजी आमदार विजयराव खडसे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी पासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे .
या आंदोलनात मोरचंडी येथील सामूहिक वन हक्क समितीचे पदाधिकारी व सर्व सदस्य तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक या आंदोलनात सहभागी झाले असून मोरचंडी येथील सामूहिक वन हक्क समितीला कामकाज करण्याच्या दृष्टिकोनातून गौण वन उत्पादन गोळा करणे त्याचा वापर करणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे यासाठी स्वामित्व हक्क मिळणे पाण्यामधील मत्स्य व अन्य उत्पादने चराई करणे तेंदु पत्ता संकलन करणे पारंपारिक मौसमी साधन संपत्ती मिळविणे इत्यादी हक्क आज पर्यंत मिळावयास पाहिजे होते परंतु ही सर्व कामे करण्यासाठी ही समिती गठित करण्यात आलेली असताना देखील सामूहिक वन हक्क समितीचे गठन करून एक वर्षाचा कालावधी लोटून गेला असला तरीही संबंधित गावच्या सामूहिक वन हक्क समितीला त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे.
सदर गावातील वन हक्क समितीला त्या भागातील कामे चालू करण्याचे आदेशित करणे गरजेचे होते परंतु सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव पैनगंगा अभयारण्य तथा विभागीय अधिकारी वन्यजीव पांढरकवडा हे या प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई करीत असून तेथील जनतेला मिळणाऱ्या सोयी सुविधेपासून संबंधित अधिकाऱ्याकडून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्या जात असल्याचा आरोप आंदोलन कर्त्याकडून करण्यात येत आहे आज आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन कर्त्यांना भेट देण्यासाठी व त्यांचे आंदोलन सोडविण्याच्या दृष्टीने प्रकल्प अधिकारी पुसद आत्माराम धाबे एस ,सी .एफ .खेळ भांडे वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव उमरखेडचे मुळे हे आंदोलन स्थळी दाखल झाले होते परंतु आंदोलन कर्त्यासोबत सोबत झालेल्या चर्चेअंती कोणताही तोडगा न निघाल्यामुळे आज संध्याकाळपर्यंत हे आंदोलन सुरू होते.
*यावेळी या आंदोलनाचे मार्गदर्शक माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार विजयराव खडसे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील चंद्रवंशी बालाजी डाखोरे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचे कारण दाखवून हे आंदोलन दडपविण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलन करते आपल्या मागण्यावर ठाम राहिल्यामुळे बंदी भागातील मोरचंडी येथील ग्रामस्थांचे महिला पुरुषांच्या उपस्थितीत सुरू असलेले हे अन्न त्याग आंदोलन अजून किती दिवस चालेल किंवा हे आंदोलन प्रशासनाकडून कशा पद्धतीने सोडविल्या जाते याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागल्याचे दिसत आहे मागील अनेक दिवसापासून मोरचंडी येथील ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे अनेक निवेदने देऊन सुद्धा प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नव्हते त्यामुळे व्यथित होऊन आम्ही हे अन्न त्याग आंदोलन सुरू केल्याची माहिती मोरचंडी येथील ग्रामस्थ तथा अन्नत्याग आंदोलन करते यादव वाघमारे आत्माराम शेळके संगीता पिंपळे मिराबाई मेंडके संदीप चव्हाण भीमराव भरकाडे कृष्णा मुंडाले भगवान आदी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनातून दिली आहे.
Its like you read my mind You appear to know so much about this like you wrote the book in it or something I think that you can do with a few pics to drive the message home a little bit but other than that this is fantastic blog A great read Ill certainly be back
I loved as much as you will receive carried out right here The sketch is tasteful your authored subject matter stylish nonetheless you command get got an edginess over that you wish be delivering the following unwell unquestionably come further formerly again as exactly the same nearly very often inside case you shield this hike