मुळावा येथे झालेली दुकानफोडी ४८ तासात उघड : दोन चोरटे ताब्यात तर तिन फरार पोलीस स्टेशन पोफाळी पोलीसांची कामगीरी
मुळावा येथे झालेली दुकानफोडी ४८ तासात उघड :
दोन चोरटे ताब्यात तर तिन फरार
पोलीस स्टेशन पोफाळी पोलीसांची कामगीरी
प्रतिनिधी
उमरखेड :
तालुक्यातील मुळावा येथील चव्हाण कलेक्शन फोडून अज्ञात चोरट्यांनी दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केला होता . घटनेला एक दिवस उलटत नाही तोच पोफाळी पोलिसांनी शिताफिने चौकशी करीत या घटनेतील पाच चोरटया पैकी दोन चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे .
पोलीसांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज व इतर तांत्रीक गोष्टींचा बारकाईने मागोवा घेतला.दि. ६ जुलै रोजीचे सायंकाळी पोफाळी पोलीसांना फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयीत इसमाबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली त्यावरून तात्काळ पथक नेमुन महागाव येथील टाउनमधील अण्णाभाऊ साठे चौकात घर असलेल्या विलास भारत ढगे, वय २७ वर्ष यास ताब्यात घेवुन त्याची घरझडती घेतली असता घरामध्ये चव्हाण कलेक्शन मुळावा येथुन चोरीस गेलेले नवीन पॅकींग असलेले शर्ट-पॅन्ट कपडे मिळुन आले. त्याबाबत विलास भारत ढगे यास ताब्यात घेवुन गुन्हया संबंधाने अधिक विचारपुस केली असता त्याने माझ्या सोबत विशाल किसन शेळके वय १८ वर्ष, रा. निंगनुर जहागीर, ओमकार फोपसे, वय २७ वर्ष रा. अण्णाभाऊ साठे चौक महागाव, एक विधीसंघर्षग्रस्त बालक, व आणखी एक इसम असे एकुण ०५ जणांनी मिळुन मोटरसायकल वर जावुन मुळावा येथील दुकान फोडुन चोरी केली असल्याचे सांगीतले.निंगनुर जहागिर ता. उमरखेड येथील विशाल किसन शेळके यास ताब्यात घेतले व त्याच्या घराची झडती घेतली असता झडतीमध्ये आणखी काही चोरी केलेले कपडे चव्हाण कलेक्शन मुळावा यांचे नाव असलेल्या पिशवीसह दिसुन आले. सदर कपडे ताब्यात घेवुन आरोपीने गुन्हा करतांना वापरलेली काळया करडया रंगाची दुचाकी पल्सर ज्याचा क. एम.एच २९ सीसी ९०१० ती मोटारसायकल सुध्दा जप्त करण्यात आली. तसेच घटनावेळी आरोपींकडुन वापरण्यात आलेला काळया पांढऱ्या रंगाचा रेडमी कंपनीचा अॅन्ड्रॉईड मोबाईल किं.अं. १०,०००/- रू. पोलीसांनी जप्त केला.सदर गुन्हयात जप्त केलेल्या मुद्देमालाची मोजनी केली असता २३ नग दुकान पॅकिंग पॅन्ट एकुण किंमत २७,६००/- रू. व १९ नग दुकान पॅकिंग शर्ट एकुण किंमत२०,९००/- रू. तसेच गुन्हयात वापरलेले दुचाकी वाहन किं.अ. ८०,०००/- रू. व घटनावेळी वापरण्यात आलेला काळया पांढऱ्या रंगाचा रेडमी कंपनीचा अॅन्ड्रॉईड मोबाईल किं.अं. १०,०००/- रू. असा एकुण १,३८,५००/- रू. चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.सदर गुन्हयामधील ताब्यात घेण्यात आलेल्या एकुण ०३ आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन एक विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. गुन्हयातील इतर दोन आरोपींचा पोफाळी पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.सदरची कारवाई पवन बनसोड, पोलीस अधिक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शना खाली पोफाळी ठाणेदार पंकज व्ही दाभाडे ठाणेदार , पिएसआय आशिष झिमटे, पो. कॉ . लखन जाधव चालक काझी यांनी पार पाडली.
Bài viết này thật sự rất hay và bổ ích! Tôi đã học được rất nhiều điều mới từ những chia sẻ của bạn. Cách bạn trình bày rõ ràng và dễ hiểu, giúp tôi nắm bắt thông tin một cách nhanh chóng.
บทความนี้เป็นเครื่องพิสูจน์ทักษะการเขียนและความเชี่ยวชาญในหัวข้อของคุณ ยอดเยี่ยม!
My brother suggested I might like this blog He was totally right This post actually made my day You can not imagine simply how much time I had spent for this info Thanks
Temp Mail I truly appreciate your technique of writing a blog. I added it to my bookmark site list and will
What i dont understood is in reality how youre now not really a lot more smartlyfavored than you might be now Youre very intelligent You understand therefore significantly in terms of this topic produced me personally believe it from a lot of numerous angles Its like women and men are not interested except it is one thing to accomplish with Woman gaga Your own stuffs outstanding Always care for it up
Somebody essentially lend a hand to make significantly posts I might state That is the very first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to create this particular put up amazing Excellent job