ढाणकी परिसरातील 560 युवकांचा काँग्रेस प्रवेश

youtube

ढाणकी परिसरातील 560 युवकांचा काँग्रेस प्रवेश

उमरखेड :
तालुक्यातील ढाणकी, सावळेश्वर, पिरंजी, मोरचंडी, गांजेगाव, निंगनुर, बाळदी, बंदीटाकळी या गावातील जवळपास 560 युवकांनी, काँग्रेस नेतृत्वाच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा येथील आर्य वै. भवन येथे शनिवारी दुपारी 2 च्या दरम्यान पार पडला. या प्रवेश सोहळ्याने ढाणकी व बंदी भागात काँग्रेसची लहर निर्माण झाली आहे.

ढाणखी येथे पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात ढाणकी, सावळेश्वर, पिरंजी, मोरचंडी, गांजेगाव, निंगनुर, बाळदी, बंदीटाकळी येथील इतर पक्षातील जवळपास 560 कार्यकर्त्यांनी पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश घेतला . यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करण्यात आले. सध्याच्या भाजप सत्ता काळात शेतकरी अतिशय अडचणीत सापडला आहे. शेतपिकाला भाव मिळत नाही , उत्पादन खर्च महागाईमुळे वाढला आहे. बेरोजगारी वर कुठलेही काम केलेल नाही. उलट राज्यातील कंपन्या परराज्यात पळविन्याच काम केल आहे. असा घनघात भाजप सत्ताधाऱ्यांवर करण्यात आला . पक्षात येणाऱ्या कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याचे काम झाले पाहिजे यासाठी तन-मन-धनाने झटणार असल्याचे तातू भाऊ देशमुख यांनी सांगितले.
विधानसभेत भाजप आमदाराची वागणुकीबद्दल बोलताना रामदेव सरकार म्हणाले , सध्या कोणत्याही आफिसवर जा पैसे दिल्याशिवाय जनतेचे काम होत नाहीत. एवढा भ्रष्टचार फोपावला आहे. की पैसे देऊनही लोकांना फिरवले जात आहे.सोबतच आमदाराकडे नागरिकांनी काम घेऊन गेल्यास आमदारांना प्रश्न पडतो , की हे काम मी करावे, की आपल्या बॉसला द्यावे.अशी पद्धत यापूर्वी कधीच मतदारसंघात पाहिली नसल्याची खंत राम देवसरकर यांनी बोलून दाखवली. सोबतच उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्वांना सूचना देत पक्षश्रेष्ठी तिकीट कोणालाही मिळो, बाकीच्यांनी एक दिलाने राहण्याची विनंती हि करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तातू देशमुख, रामदेव सरकर गोपाल अग्रवाल, दत्तराव शिंदे बाळासाहेब चंद्रे अमोल तुपेकर, तालीब शेख, साहेबराव कांबळे, दादाराव गव्हाळे , सुभाष नाईक , सुभाष गायकवाड, अजय माहेश्वरी , मीनाक्षी सावळकर, प्रमोदिनी रामटेके , इम्रान पठाण , रामराव गायकवाड, मिलिंद धुळे, कविता पोपुलवाड, पीसी भोळे, इरफान मस्तान आदी शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव गोपेवाड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी वैद्य यांनी मानले.

Google Ad
Google Ad

7 thoughts on “ढाणकी परिसरातील 560 युवकांचा काँग्रेस प्रवेश

  1. Masalqseen I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.

  2. Masalqseen This is really interesting, You’re a very skilled blogger. I’ve joined your feed and look forward to seeking more of your magnificent post. Also, I’ve shared your site in my social networks!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!