स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष ताकदीनिशी लढणार— साहेबराव कांबळे उमरखेड :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष ताकदीनिशी लढणार— साहेबराव कांबळे
उमरखेड :
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढणार असून, या निवडणुका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज राहून एकजुटीने काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी केले.
तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या नूतनीकरण उदघाटन सोहळा वेळी ते बोलत होते. कांबळे यांनी सांगितले की, विधानसभेत 93 हजारांच्या जवळपास मतांचा डोंगर उभा राहिला, याचे यश कार्यकर्त्यांचेच होते. तेव्हा कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले, आता माझी बारी आहे. स्थानिक निवडणुकांत. एकदिलाने उभे राहिलो तर सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी होईल.पक्षासाठी इमानदारीने मेहनत करणाऱ्यांनाच तिकीट मिळेल. काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, आगामी निवडणुकांमध्ये जनतेच्या मुद्द्यांवर लढा देत सत्ता मिळवणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नियोजन, जनसंपर्क व प्रचाराचे आराखडे तयार करण्यात येत असून, काँग्रेस पक्ष विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांच्या विश्वासास पात्र ठरेल, असा विश्वास यावेळी कांबळेंनी व्यक्त व्यक्त केला.
या कार्यक्रमात काँग्रेस नेते तातूभाऊ देशमुख यांची काटोल विधानसभा प्रभारी म्हणून निवड, कयाम नवाब यांची अल्पसंख्यांक सेलच्या प्रदेश सचिवपदी तर सूर्यकांता दिडाळकर यांची महिला तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी सभापती रामभाऊ देवसरकर, तालुकाध्यक्ष दत्ताराव शिंदे, शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, विधानसभा समन्वयक प्रेमराव वानखेडे, गोपाल अग्रवाल, महिला तालुका अध्यक्ष सूर्यकांता दिडाळकर तसेच काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
This really answered my problem, thank you!