कृषी महाविद्यालयात ‘महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे’ उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा व करिअर मार्गदर्शन
कृषी महाविद्यालयात ‘महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे’
उत्साहात साजरा;
विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा व करिअर मार्गदर्शन
उमरखेड (प्रतिनिधी):
वाहतूक नियंत्रण उपशाखा उमरखेड आणि कृषी महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे’ निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा’ या ब्रीदवाक्याला अनुसरून विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा आणि भविष्यातील करिअरच्या संधींबाबत याप्रसंगी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन चिंतले होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे उपस्थित होते.
वाहतूक सुरक्षा आणि करिअर मार्गदर्शन
प्रमुख मार्गदर्शक अमोल गुंडे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि सुरक्षिततेचे महत्त्व पटवून दिले. केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे, तर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, स्पर्धा परीक्षांविषयी (Competitive Exams) सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवांमध्ये येण्यासाठी कशी तयारी करावी, अभ्यासाचे नियोजन कसे असावे आणि जिद्द व चिकाटीने यश कसे संपादन करावे, यावर त्यांनी भाष्य केले.
कार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक गजानन खुपसे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, विविध रस्ते चिन्हांचे महत्त्व आणि दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. रस्ते सुरक्षा चिन्हांची माहिती नसल्यामुळे अनेकदा अपघात होतात, त्यामुळे चिन्हांचा अर्थ समजून घेणे आणि हेल्मेटचा वापर करणे हे जीवाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य असल्याचे त्यांनी पटवून दिले.
अध्यक्षीय भाषणातून जनजागृती
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. सचिन चिंतले यांनी रस्ते सुरक्षेच्या अभावामुळे होणाऱ्या जीवित व वित्तहानीबद्दल चिंता व्यक्त केली. रस्ते अपघातांमुळे होणारे सामाजिक व कौटुंबिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून इतरांनाही जागृत करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पवार, शिवाजी चंद्रवंशी, नागेश वास्टर, गजानन खुपसे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयातील प्रा. योगेश वाकोडे, प्रा. अनिल इंगळे, प्रा. डॉ श्वेता सोळंके आणि प्रा. डॉ माधवी भालाधरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुषार चव्हाण यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सुनील पवार यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.




Hãy thử vận may của bạn tại 888SLOT ngay bây giờ. Biết đâu hôm nay chính là ngày bạn nổ hũ Jackpot hàng tỷ đồng! (Tiếp tục biến tấu cho đến đoạn 100 với các từ như: đăng ký ngay, click link, thử vận may…) TONY01-06S