भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे नाजिया इलाही खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी; उमरखेड पोलीस ठाण्यात निवेदन सादर

youtube

भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे नाजिया इलाही खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी; उमरखेड पोलीस ठाण्यात निवेदन सादर

उमरखेड : प्रेषित हजरत मोहम्मद (स.) तसेच त्यांच्या कुटुंबीयांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या नाजिया इलाही खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चा, उमरखेड यांच्या वतीने उमरखेड पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांनी नागपूर येथे नोंदविलेल्या आक्षेपाच्या अनुषंगाने, जिल्हा उपाध्यक्ष रहेमत जागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतीक मौलाना तसेच भाजप अल्पसंख्याक महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा अंजुम परवीन यांचे मार्गदर्शन लाभले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नाजिया इलाही खान यांच्या कथित वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. मुस्लिम समाजात हजरत मोहम्मद (स.) यांच्याविषयी अत्यंत आदर व श्रद्धेची भावना असून, त्यांच्याविषयी कोणतेही आक्षेपार्ह अथवा अपमानास्पद वक्तव्य सहन केले जाणार नाही. त्यामुळे नाजिया इलाही खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप अल्पसंख्याक मोर्चा, उमरखेड यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी सय्यद मुसा (जिल्हा सचिव), सादिक ठेकेदार (जिल्हा सदस्य), इस्राईल बाबा (जिल्हा उपाध्यक्ष), जावेद खान (जिल्हा सदस्य), अत्ताउल्लाह खान (जिल्हा सदस्य), इम्रान खान (शहराध्यक्ष), नासिर शेख (युवा नेते), हमीद खान, सय्यद वसीम, अथरुद्दीन खतीब, सय्यद राजिक, शेख रहीम तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

5 thoughts on “भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे नाजिया इलाही खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी; उमरखेड पोलीस ठाण्यात निवेदन सादर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!