*काँग्रेसमध्ये निष्ठावंतांवर अन्याय, विश्वासघातामुळेच शिवसेनेत प्रवेश’ – साहेबराव कांबळे* पत्रकार परिषद उमरखेड :

youtube

‘*काँग्रेसमध्ये निष्ठावंतांवर अन्याय, विश्वासघातामुळेच शिवसेनेत प्रवेश’ – साहेबराव कांबळे*
पत्रकार परिषद
उमरखेड :

काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय, वरिष्ठ नेत्यांनी दिलेला शब्द न पाळणे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता पक्षातून निष्कासित केल्यामुळेच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला, असा दावा काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस.. साहेबराव कांबळे यांनी केला.

शिवसेनेत प्रवेशानंतर सोमवारी प्रथमच उमरखेड येथे आगमन झाल्यावर माहेश्वरी चौकात शिवसैनिकांनी बँड, फटाके आणि जल्लोषात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर गोकुळ नगर येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या पक्षांतरामागील कारणांचा सविस्तर खुलासा केला.

साहेबराव कांबळे म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार असताना वरिष्ठ नेत्यांनी आवश्यक संख्याबळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्याची पूर्तता झाली नाही. बहुमत नसतानाही उमेदवारी अर्ज भरावा लागला आणि अखेरीस माघार घ्यावी लागली. ही आपल्यासाठी मोठी राजकीय फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसमधील काही नेत्यांनी स्वतःच पक्षविरोधी काम केले, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले आणि वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोपही त्यांनी केला. प्रेमराव वानखेडे यांच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आपल्याला कोणतीही नोटीस न देता पक्षातून निष्कासित करण्यात आले. एका सामान्य कर्मचाऱ्यालाही सेवेतून कमी करण्यापूर्वी नोटीस दिली जाते, मात्र माझ्याबाबत ती साधी प्रक्रियाही पाळली गेली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हाध्यक्षांसह काही स्थानिक नेत्यांवरही गंभीर आरोप करत निवडणुकांमध्ये पक्षाचेच नुकसान करण्यात आल्याचा दावा केला. बाजार समिती, नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अंतर्गत गद्दारीमुळे पक्षाला फटका बसल्याचेही ते म्हणाले.

आपला शिवसेनेतील प्रवेश हा कोणत्याही पदासाठी किंवा दबावाखाली नसून स्वाभिमान आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी घेतलेला निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत उमरखेड मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढविण्यासाठी गावागावात शाखा उभारून प्रत्येक घरात शिवसैनिक तयार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेदरम्यान साहेबराव कांबळे यांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण, विधानपरिषद निवडणुकीतील घडामोडी आणि पक्षातील विश्वासघाताबाबत अनेक गंभीर आरोप केले. यावेळी चितांगराव कदम एडवोकेट संजीव जाधव रवी रुडे, संतोष जाधव, मोहन नाईक, प्रवीण पाटील मिराशे, उपस्थित होते

5 thoughts on “*काँग्रेसमध्ये निष्ठावंतांवर अन्याय, विश्वासघातामुळेच शिवसेनेत प्रवेश’ – साहेबराव कांबळे* पत्रकार परिषद उमरखेड :”

  1. Thanks a bunchh foor shaing thiks with aall people you actually knopw wuat youu
    aare speaking approximately! Bookmarked. Plwase additionally vissit mmy ite =).
    We ciuld havbe a hyperlink exchange arangement among us xnxx

  2. [3712]vegasnova Official Login | সেরা অনলাইন স্লট গেম ও বিকাশ ডিপোজিট,vegasnova-এ আজই লগইন করে সেরা স্লট গেমটি উপভোগ করুন। বিকাশ দিয়ে সহজে ডিপোজিট এবং অ্যাপ ডাউনলোড করে দ্রুত গেম খেলুন। এখনই জয়েন করুন! visit: vegasnova

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!