उमरखेड बायपासवर ट्रकची कारला पाठीमागून धडक; कार तीन पलट्या खात उलटली काँग्रेस नेत्यासह पाच जण जखमी; ट्रकचालकाविरुद्ध कारवाईची मागणी उमरखेड | प्रतिनिधी
उमरखेड बायपासवर ट्रकची कारला पाठीमागून धडक; कार तीन पलट्या खात उलटली
काँग्रेस नेत्यासह पाच जण जखमी; ट्रकचालकाविरुद्ध कारवाईची मागणी
उमरखेड | प्रतिनिधी
महागावहून उमरखेडकडे येत असताना उमरखेड बायपास मार्गावर तुलशी हॉटेलजवळ कारला पाठीमागून भरधाव ट्रकने धडक दिल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास घडली. या अपघातात कार तीन पलट्या खात रस्त्यावर उलटली. कारमधील चालकासह पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, महागाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शैलेश दिलीपराव सुरसे (वय ४०) हे त्यांच्या कार क्रमांक एम.एच. १२ ए.एन. ८८७५ मधून उमरखेडकडे येत होते. त्यांच्यासोबत शिवाजी अशोकराव नरवाडे (२९), निलेश विश्वासराव नरवाडे (४०), अमर नंदकुमार नरवाडे (३५) आणि समाधान श्रीराम राऊत (३५) हे प्रवास करत होते.
उमरखेड बायपासवरील तुलशी हॉटेलजवळ त्यांच्या कारला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. धडकेनंतर कार तीन पलट्या खात रस्त्यावर उलटली. अपघातानंतर कारमधील सर्वजण बाहेर पडले. समाधान राऊत यांनी त्यांच्या मोटारसायकलवरून अपघाताची माहिती उमरखेड पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालय, उमरखेड येथे दाखल केले. सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याच्या फुटेजवरून कारला धडक देणारा ट्रक एम.एच. २६ बी.डी. ६२७५ असल्याचे समोर आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सदर ट्रक चालकाचे नाव योगेश हनमंत जामकर (वय २१, रा. डोंगरगाव, ता. जळकोट, जि. लातूर) असल्याचे तक्रारीत नमूद आहे. ट्रकल चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून कारला पाठीमागून धडक दिल्याचा आरोप करत संबंधित चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शैलेश सुरसे यांनी उमरखेड पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केली आहे.
या घटनेचा पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहेत.


A very straightforward platform that does not complicate things. I appreciate the transparency and the fair odds. I’ll be spending more time on kkk123 from now on.
Absolute game changer! The rewards are generous and the customer support is always on point. Go to phjljl888