उमरखेडची वाहतूक नियंत्रण शाखा पुन्हा सुरू करा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नावे निवेदन; उमरखेड पोलीस ठाण्यात स.पो.नि. लक्ष्मी मुलकुलवार यांच्याकडे सुपूर्द उमरखेड :
उमरखेडची वाहतूक नियंत्रण शाखा पुन्हा सुरू करा
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नावे निवेदन; उमरखेड पोलीस ठाण्यात स.पो.नि. लक्ष्मी मुलकुलवार यांच्याकडे सुपूर्द
उमरखेड : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वाहनांची वाढती संख्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून उमरखेड येथील बंद करण्यात आलेली वाहतूक नियंत्रण उपशाखा पूर्ववत सुरू करून स्वतंत्र वाहतूक शाखा पुनर्स्थापित करावी, अशी मागणी समस्या निराकरण समाधान ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या नावे असलेले निवेदन दि. १३ ऑगस्ट रोजी उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये स.पो.नि. लक्ष्मी मुलकुलवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
दि. २४ जुलै २०२६ रोजीच्या पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या आदेशानुसार उमरखेड येथील वाहतूक नियंत्रण उपशाखा बंद करून तेथील अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती पोलीस स्टेशन उमरखेड येथे करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध राहिलेली नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
उमरखेड शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, शाळा-महाविद्यालये, धार्मिक स्थळे तसेच मुख्य रस्त्यांवर वाहनांची वाढती गर्दी, अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होत आहे. सण-उत्सव, मिरवणुका आणि आठवडी बाजाराच्या दिवशी ही समस्या अधिक गंभीर होते. त्यामुळे शहरासाठी स्वतंत्र वाहतूक यंत्रणा आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पोलीस ठाण्याच्या नियमित कामकाजासोबत वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडल्यास पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उमरखेडची वाहतूक नियंत्रण उपशाखा पूर्ववत सुरू करून आवश्यक अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र नियुक्ती करावी, तसेच प्रमुख चौकांमध्ये नियमित वाहतूक नियमन व अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी डॉ. राम नाईक, दीपक ठाकरे, विजय आडे, गणेश शिंदे, सुरेश वाघ, स्वप्नील मगरे, बंडू पाध्ये, दीपक ग्यानचंदाणी, प्रशांत आयाचित व उपस्थित होते.


Finally a platform that doesn’t lag during big wins. Very reliable and easy to navigate. Get started with phcash11comlogin right now.
It’s not mmy fiirst timje tto viisit tis website,i aam browsijng this site daijlly annd take nide fact frkm hdre every day.
xnxx