उमरखेड उपविभाग स्वतंत्रच ठेवा; आकृतिबंधात स्थलांतर करू नका– आमदार किसनराव वानखेडे यांचे मृद व जलसंधारण विभागाला पत्र

youtube

उमरखेड उपविभाग स्वतंत्रच ठेवा; आकृतिबंधात स्थलांतर करू नका–
आमदार किसनराव वानखेडे यांचे मृद व जलसंधारण विभागाला पत्र

उमरखेड

मृद व जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतिबंधानुसार यवतमाळ जिल्ह्यातील विविध उपविभागांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू असताना, उमरखेड येथील मृद व जलसंधारण उपविभाग इतरत्र स्थलांतरित करू नये, अशी मागणी उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे यांनी केली आहे.
याबाबत आमदार वानखेडे यांनी मृद व जलसंधारण विभागाचे प्रभारी मुख्य अभियंता अनंत जगताप यांना दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी पत्र दिले आहे. उमरखेड येथील उप-अभियंता कार्यालय सध्या कार्यरत असून, नवीन आकृतिबंधाच्या नावाखाली त्यात कोणताही बदल करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
पत्रात नमूद केल्यानुसार, उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील उमरखेड व महागाव हे दोन्ही तालुके या उपविभागाच्या कार्यक्षेत्रात येतात. उमरखेड हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून मुख्य ठिकाणांपासून दूर असलेला परिसर आहे. त्यामुळे येथील शेतकरी व नागरिकांच्या दृष्टीने स्वतंत्र मृद व जलसंधारण उपविभाग अत्यंत आवश्यक असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.
जलसंधारणाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शेतकऱ्यांचे हित तसेच प्रशासनाच्या दृष्टीने उमरखेड येथे स्वतंत्र उपविभाग कायम राहणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
उमरखेड उपविभागाचे इतर कोणत्याही उपविभागात समाविष्ट किंवा संलग्न न करता, तो पूर्ववत स्वतंत्रपणे सुरू ठेवावा, अशी मागणी आमदार किसनराव वानखेडे यांनी केली आहे. या मागणीमुळे उमरखेड तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या हिताचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

5 thoughts on “उमरखेड उपविभाग स्वतंत्रच ठेवा; आकृतिबंधात स्थलांतर करू नका– आमदार किसनराव वानखेडे यांचे मृद व जलसंधारण विभागाला पत्र”

  1. Hello wouuld you mibd leting mee knoiw wgich webhost you’re utilizing?
    I’ve lladed your blkg iin 3 completely diffetent browwers and I must saay tthis blog loads
    a lott qucker then most. Caan yyou sugvgest a good weeb hostiing provider att a hknest price?
    Manyy thanks, I appreciae it! xnxx

  2. I was searching for a casino site that feels lively and rewarding and that is exactly what wildcarnivalcasino offers. The slot collection is massive and the bonus structure actually makes sense for regular players. Every session feels fresh and the team clearly cares about keeping things entertaining. A solid choice for weekend fun.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!