इंदिरानगर वस्तीमध्ये ‘आनंदाची दिवाळी’; गरजू महिलांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य! प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद; उमरखेड शहर मंडळाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम उमरखेड | प्रतिनिधी
संपादक – सविता चंद्रे | चालू घडामोडी उमरखेड
इंदिरानगर वस्तीमध्ये ‘आनंदाची दिवाळी’; गरजू महिलांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य!
प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद; उमरखेड शहर मंडळाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम
उमरखेड | प्रतिनिधी
प्रदेशाध्यक्ष माननीय रविंद्रजी चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उमरखेड शहर मंडळाच्या वतीने शहरातील इंदिरानगर या उपेक्षित वस्तीमध्ये ‘आनंदाची दिवाळी’ हा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी वस्तीतील गरजू महिलांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गोरगरीब, गरजू आणि अडल्या-नडलेल्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, त्यांनाही सणाचा आनंद घेता यावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
“हे देवाच्या मनातले काम आहे. देवानेच एखाद्या व्यक्तीची या कार्यासाठी निवड केलेली असते,” असा सेवाकार्याचा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला.
“जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे; निराधार आभाळाचा तोच भार साहे,” या भावनेतून गरजूंची सेवा करणे हे ईश्वराने सोपविलेले कार्य आहे. आपण केवळ त्या कार्याचे माध्यम आहोत. ‘मी केले, माझ्यामुळे झाले’ हा अहंकार सेवाकार्याचा सुगंध नष्ट करतो. त्यामुळे प्रत्येकाने निःस्वार्थ भावनेने समाजसेवा करावी, हाच या उपक्रमातून महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचा छोटासा दिवा पेटविणे, हीच खरी दिवाळी असल्याचे या उपक्रमाने दाखवून दिले.या आयोजित कार्यक्रमाला पुसद जिल्हा अध्यक्ष डॉ आरती फुपाटे,मा.जी आमदार उत्तमराव इंगळे,महेश काळेशवर ,आदी पद आधिकारी उपस्थितीत होते
छायाचित्र : इंदिरानगर वस्तीमध्ये ‘आनंदाची दिवाळी’ उपक्रमांतर्गत गरजू महिलांना दिवाळी भेटवस्तूंचे वाटप करताना उमरखेड शहर मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
संपादक : सविता चंद्रे नारिशक्ती न्युज उमरखेड

