मनाला सुन्न करनारी घटना वानवाडी येथील 55 वर्षी य महिलेस जिवंत जाळले.हातातील बांगड्या मुळे उघडले खुनाचे रहस्य.

youtube

वानवाडी येथील 55 वर्षीय महिलेस जीवंत जाळले

तामसा…

हतातील बागड्या मुळे उघडले खुनाचे रहस्य

तामसा येथून 10 की मि अंतरावर असलेलेल्या वानवाडी येथील राहिवाशी असलेली महिला लक्ष्मीबाई दत्ता खुपसे ही आपल्या शेतात दि 27 में रोजी सकाळी 9 वाजता शेल्या घेऊन चारण्यसाठी गेली होती तेव्हा शेतात मशागत करणारा आरोपी हणमंत दिगंबर खुपसे वय 27 वर्ष याने लक्ष्मीबाई खुपसे यांच्या डोक्यात जबर मार देऊन शेतात लाकड़ी ढिगावर टाकून जीवंत जाळल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे
तामसा पोलिस सूत्रा कडून मिळालेल्या माहिती नुसार यातील मयत महिला लक्ष्मीबाई दत्ता खुपसे ही आपल्या घरुन शेतात शळया चारण्यसाठी दि 27 में रोजी सकाळी 7 वाजता गेली होती तेव्हा आरोपी हणमंत दिगंबर खुपसे वय 27 वर्ष रा वानवाडी हा आपल्या शेतातील ठिकाणी मशागतिचे काम करत होता तेव्हा लक्ष्मीबाई खुपसे ही एकटी शेतात आल्याचे पाहुन जागेचा वादावरुन आरोपी हणमंत खुपसे याच्या मनात चांगलाच रुजला होता तेव्हा लक्ष्मीबाई खुपसे हिचा खून करण्याच्या बताने तिच्या डोक्यात जबर वार करून बेशुद् केले व स्वताच्या शेतात लाकड़ी ढिग असलेल्या ठिकाणी मयत लक्ष्मीबाई खुपसे यांना ढिगावर टाकून पुरवा नष्ठ करण्याच्या हेतुने जाळून टाकले तेव्हा मयत लक्ष्मीबाई चा पती दत्ता खुपसे है आपली पत्नी शेता मधुन घरी का आली नाही याचा शोध घेण्यासाठी दि27 में रोजी वानवाडी जंगलात गेला असता त्याला शोध लागला नसल्याने म्हणून मोठा लोभाजी खुपसे हा पण वानवाडी येथील शिवरात आपल्या शेता कड़े गेला तेव्हा त्याला काही तरी करप्ट व उग्र वास् आल्याने त्या ठिकाणी जाऊंन पहिले असता उजव्या हताच्या बागद्या दिसून आल्याने हे बागड्या माझ्याच आई च्या आसल्याचे समजताच ही घटना वाऱ्यासारखी वानवाडी परिसरात पसरली होती या घटनेची माहिती तामसा पोलिसांना मयताच्या मोठा मुलगा लोभाजी दत्ता खुपसे याने दिली तेव्हा घटनास्थली सपोनि अशोक उजगिरे,पोलिस उपनिरक्षक बालाजी किरवले यांनी रात्री 12:30 वाजता भेट दिली या वेळी घटना स्थळी पाहणी करून आरोपी हणमंत दिंगबर खुपसे याला पकडण्यत आले या वेळी पोलिस उपविभागीय अधिकारी अर्चना पाटिल यांनी तामसा पोलिस स्टेशन ला भेट दिली या वेळी फिर्यदि लोभाजी दत्ता खुपसे यांनी दिलेल्या फिर्यदि वरुण आरोपी हणमंत दिंगबर खुपसे यांच्या विरुद्ध 302,201,भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अशोक उजगिरे है करित आहेत

Google Ad
Google Ad

2 thoughts on “मनाला सुन्न करनारी घटना वानवाडी येथील 55 वर्षी य महिलेस जिवंत जाळले.हातातील बांगड्या मुळे उघडले खुनाचे रहस्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!