मोदींविरुद्ध वक्तव्य केल्या प्रकरणी खा . संजय राऊत यांच्याविरुद्ध उमरखेड पोस्टे येथे तक्रार दाखल

youtube

मोदींविरुद्ध वक्तव्य केल्या प्रकरणी खा . संजय राऊत यांच्याविरुद्ध उमरखेड पोस्टे येथे तक्रार

उमरखेड प्रति : –

खासदार संजय राऊत यांनी आपल्या वृत्तपत्रातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध वक्तव्य करून बदनामी केल्याप्रकरणी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमरखेड पोलीस स्टेशन येथे दि 11 डिसेबर रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची तक्रार दिली आहे .
दिलेल्या तक्रारीनुसार , दैनिक सामना वृत्तपत्रांचे संपादक संजय राऊत हे नेहमीच जाणीव पूर्वक त्यांच्या वृत्तपत्रातून देश विरोधी व प्रक्षोभक असे विधान करीत असतात भारत देश हा सर्व धर्म समभावाचा देश असून संपादक हे जाणीवपूर्वक त्यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रातून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल व शांतता प्रिय असलेल्या भारत देशात अशांततेचे वातावरण निर्माण होईल असे लिखान करीत असतात . झालेल्या परिस्थितीवरून भारत देशाचे जागतिक पातळीवर बदनामी होऊन भारत हा धर्मविरोधी देश आहे असे भासविण्याची संपादकाची मनस्वी इच्छा दिसून येत असल्याचे सांगितले त्या बाबतीत नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला तीन राज्याच्या विधान सभेच्या निवडणुकीत अभुतपूर्व असे बहुमत मिळाले असून
सदर विजयाचे विश्लेषण संबंधी लेख संपादक खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या दैनिक सामना या वृत्तपत्रात प्रसिद्धी केले सदर लेखात संविधानिक पदावर विराजमान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरुद्ध अक्षपार्य व प्रक्षोभक असे विधान केल्यामुळे
त्यांचे वक्तव्य हे गंभीर स्वरूपाचे असून त्यांनी केलेले वक्तव्य इतकी गंभीर असून भारत देशाची उंचावलेली प्रतिमा जागतिक पातळीवर कमी होऊन भारत हा देश धर्मविरोधी देश झाला आहे असे दाखवण्याचा प्रयत्न असून दोन देशात दोन धर्मात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राऊत हे करीत असल्याचे त्यांच्या लिखाणातून केले आहे म्हणून संजय राऊत यांना अटक करा करून देशद्रोही प्रक्षोभक वक्तव्य केल्यामुळे विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून कारवाई करण्याकरिता भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमरखेड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे .

Google Ad
Google Ad

3 thoughts on “मोदींविरुद्ध वक्तव्य केल्या प्रकरणी खा . संजय राऊत यांच्याविरुद्ध उमरखेड पोस्टे येथे तक्रार दाखल

  1. I loved as much as you will receive carried out right here The sketch is tasteful your authored subject matter stylish nonetheless you command get got an edginess over that you wish be delivering the following unwell unquestionably come further formerly again as exactly the same nearly very often inside case you shield this hike

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!