विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला वाचविण्याच्या नादात चारचाकी दुभाजकावर आदळली..
*विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला वाचविण्याच्या नादात, चारचाकी दुभाजकावर आदळली.*
(५ जण गंभीर जखमी, तर एक चिमुकली गतप्राण.)
माहूरगड येथून देवदर्शन करून परत जात असताना विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रॅक्टर जाण्याकरिता सुरक्षित जागा देणाच्या नादात एका कारचा भीषण अपघात झाला असून यात एकाच कुटुंबातील ५ जण गंभीर झाले असून एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना महागाव तालुक्यातील खडका उड्डाणपुलाजवळ घडली.
मिळालेल्या माहिती नुसार जालना येथील उज्जैनकर कुटुंब आज आपल्या स्वतःच्या वॅगनोर गाडी क्रमांक एम. एच. ११ वाय. २३३७ या ४ चाकी कारने माहूर येथील देवदर्शन आटोपून गावी परत जात होते. दरम्यान खडका गावानजीक असलेल्या उड्डाणपूलवर समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला जाण्यासाठी सुरक्षित जागा देण्याच्या नादात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी रस्तादुभाजकावर जाऊन आदळली. आणि यातून भीषण अपघात झाल्याने उज्जैनकर कुटुंबातील ५ जण गंभीर जखमी झाले असून एका नवजात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.
ज्ञानेश्वरी उजैनकर ( अं .१ वर्षे ) असे मृतक बाळाचे नाव तर चंद्रकांत उज्जैनकर ( ५२ ), भाग्यश्री चंद्रकांत उज्जैनकर वय ( ३८ ) आरती उज्जैनकर ( ४२ ) सुरेखा उज्जैनकर ( ६० ) सार्थक उज्जैनकर ( ०६ ) सर्व राहणार जालना असे गंभीर जखमीचे नावे आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे .
अपघात नंतर जखमींना उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तर यातील नवजात बालकास डॉक्टरांनी मृत घोषित केले..
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.