ढाणकी शहरात बिबट्याचा तांडव. शहरानजीक असलेल्या शेतात वासराचा पाडला फडशा.

youtube

ढाणकी शहरात बिबट्याचा तांडव.

शहरानजीक असलेल्या शेतात वासराचा पाडला फडशा.

ढाणकी – प्रतिनिधी :

शहरातील फुलसावंगी फाटा( बाळासाहेब ठाकरे चौक), शिक्षक कॉलनी नजीकच असलेल्या शत्रुघ्न योगेवार यांच्या शेतात, काल रात्री बिबट्याने शेतात बांधून असलेल्या वासराचा फडशा पाडला. ही वार्ता शहरात पसरताच बघ्यांची एकच गर्दी जमली होती. अवघ्या पाच ते सहा महिन्याचे वासरू, शेजारी गाई नजीक बांधून असताना, रात्री बिबट्या शेतात घुसून त्या वासरास फाडून पसार झाला. योगेवार यांचे शेत ढाणकी फुलसांगी रोडवर असुन, शेताच्या उजव्या बाजूला शिक्षक कॉलनी, डाव्या बाजूला एमएसईबीची कॉलनी, आणि शेताच्या बाजूलाच शाळा, चारही बाजूने लोक वस्ती असताना सुद्धा बिबट्या येतो आणि वासराला फाडून खातो. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता बिबट्यासारखे प्राणी शहरात घुसू लागल्यावर शेतकऱ्यांनी रात्रपाळीला पाणी देण्यास सुद्धा जायचे कसे? ही फार चिंतेची बाब झाली असून, वनविभागाने यावर ॲक्शन घेऊन सदर प्राण्यास जंगलात सोडावे अशी मागणी नागरिक करताना दिसत होते.

Google Ad
Google Ad

1 thought on “ढाणकी शहरात बिबट्याचा तांडव. शहरानजीक असलेल्या शेतात वासराचा पाडला फडशा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!