चार वर्ष्यापासून रखडलेल्या निधी मिळण्यासाठी इंग्रजी शाळा संचालकांचे निवेदन.
![](https://narishaktinews.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230622-WA0661-1024x326.jpg)
चार वर्ष्यापासून रखडलेल्या निधी मिळण्यासाठी इंग्रजी शाळा संचालकांचे निवेदन.
उमरखेड :-सविता चंद्रे
इंग्रजी माध्यमच्या शाळांमध्ये शासना मार्फत दुर्बल व वंचित घटकातील विध्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्यात येतो ज्या शाळांमध्ये २०१९ – २०२० पासुन प्रवेश दिला असतांना आता पर्यंत निधी संस्थांना प्राप्त झालेला नाही या निधी अभावी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आर्थिक दृष्ट्या अडचणीत आल्या आहे. हा निधी मिळावा म्हणुन शाळांनी पाठपुरावा केला असतांना राज्य सरकारने या संदर्भात दखल घेतली नाही. शाळा सत्र लवकरच सुरु होत असल्याने हा रखडलेला निधी तात्काळ देण्यात यावा. या साठी शहर व तालुक्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालकांनी एकत्रित पणे येऊन २२ जून रोजी गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन सादर करुन मागणी केली. शासनाने या बाबत दखल घेतली नाही तर आंदोलन केले जाईल असेही म्हंटले आहे.
या शिवाय इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आवश्यक नसणारी व लागु नसणारी माहिती मागविण्यात येते त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचारी यांचा यात बराच वेळ जातो. फीस न भरणाऱ्या पालकांना टी. सी. देणेसाठी सक्ती न करणे,हा प्रकार खेदजनक असल्याच्या प्रतिक्रिया शिष्टमंडळाने व्यक्त केल्या.
या वेळी इंग्रजी माध्यमांचे असलेल्या मेस्टा या संस्थेचे अध्यक्ष अजय झरकर, पदाधिकारी ऍड संतोष जैन, दर्शन अग्रवाल, अविनाश पोंगाने, गंगासागर, डॉ नरेश गंधेवार, ऍड वासिम अहेमद, भगवान अग्रवाल, संतोष माहेश्वरी, राजेश देशपांडे, भारत कुलकर्णी,विजय जयस्वाल विजया ठाकरे, मनिषा फुलेवार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमोल चव्हाण, व इतर शिक्षक शिक्षिका व संचालक उपस्थित होते पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे प्रमुख पांडुरंग खांडरे यांनी निवेदन स्वीकारले.